शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाहीतर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य
2
अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप
3
बिघाड असलेली पोर्शे वडिलानेच दिली आपल्या लेकाच्या ताब्यात; विशाल अग्रवालसह तिघांची पोलिस कोठडीत रवानगी
4
पुण्यातील पोर्शेच्या घटनेनंतर यूपी पोलीस ॲक्शनमोडवर; २ मुलांच्या मृत्यू प्रकरणी एकाला ६ महिन्यांनंतर अटक
5
सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला
6
आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस
7
मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली
8
चोरी गेलेले, हरवलेले हजारो मोबाइल दिले परत; सीईआयआर पोर्टलच्या मदतीने केला तपास
9
बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली
10
दुष्काळावर उपाययोजना करायच्या आहेत; आचारसंहिता शिथिल करा, राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती 
11
२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही
12
अल्पवयीन मुलाला झाडाला बांधून मारहाण, श्रीरामपूरमधील घटना : चौघांवर गुन्हा दाखल
13
‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार
14
जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला
15
आरबीआयकडून केंद्राला २.११ लाख कोटींचा लाभांश
16
मातोश्रीच्या ‘लाचार श्री’ना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा; कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी 
17
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
18
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
19
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
20
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी

मिरचीने शेतकऱ्याच्या जीवनात आणला गोडवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:43 AM

भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने शेतकऱ्यांनी वाल, पावटे, हरभरा, तुर यांसारख्या पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

- राहुल वाडेकरविक्रमगड : भात कापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकत असल्याने शेतकऱ्यांनी वाल, पावटे, हरभरा, तुर यांसारख्या पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. त्यात भर म्हणजे रब्बी हंगामात तालुक्यात भाजीपाला लागवड मोठया प्रमाणात होऊ लागले असुन काही शेतकरी यातुन लाखो रु पये कमवत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतीचे अर्थकारण बदलण्यास सुरु वात झाली आहे.तालुक्यातील मलवाडा गाव पिंजाळ नदी काठी वसले असुन पाण्याची उपलब्धता असतानाही पडिक जागेचे प्रमाण अधिक आहे. असे असताना मलवाडा गावातील प्रयोगशील शेतकरी कमलाकर सदाशिव भोईर यानी आपल्या डोंगराच्या उताराला असलेल्या पडीक जागेत एक एकर मध्ये पहिल्यादाच मिरची पिकाची लागवड करुन लाखो रु पये उत्पन्न मिळवले आहे.कष्टाला तंत्रज्ञानाची साथ दिल्यास अल्प क्षेत्रातदेखील जास्तीत- जास्त उत्पन्न घेता येऊ शकते येथील शेतकरी कमलाकर सदाशिव भोईर यांनी करून दाखिवला आहे.त्यांनी आपल्या मध्यम प्रतीच्या एक एकर क्षेत्रात मिरची या पिकाच्या ‘इंदु’ या वाणाच्या तिखट मिरचीची लागवड केली आहे. यामध्ये त्यांना एक एकर साठी १० पैकेट (१ किलो) बियाणे लागले. औषधे, खते (सेंद्रिय), बी, मजुरी याचा एकुण ४५ हजार खर्च आला. उन्हाळा असल्या कारणाने दोन दिवसातुन एकदा पाणी द्यावे लागते. तर दीड महिन्यांच्या कालावधी नंतर मिरचीचे उत्पन्न सुरु झाले. एक आठवड्यातुन ते तोडा करत असुन एक टन मिरचीचे उत्पन्न मिळत आहे.>सेंद्रिय पद्धतीने मिरची पिकाची लागवडसाधारण अडिच महिन्यापूर्वी मध्यम प्रतीच्या एक एकर जमिनीत वाफे पद्धतीने मिरचीच्या रोपांची लागवड करून पाण्याचे नियोजन केले आहे. नियमित आणि आवश्यक तितकेच पाणी दिल्याने रोपांच्या मुळ्या जमिनीत व्यविस्थत स्थिर होऊन पीक जोमात वाढले. अडिच महिन्याच्या कालखंडात रोगमुक्त औषधांचा मात्रा दिल्याने पिकाची रोगराईपासून मुक्ती होण्यास मदत झाली. त्यातच कंपोस्ट आणि शेणखताचा अधिक वापर केल्याने झाडाला रोगमुक्त फुले आली.>या वर्षी दुष्काळा ची तीव्रता जास्त असल्याने तोडीव पिकांच्या लागवडी उत्पादकांना करता न आल्याने मालाचा तुटवडा निर्माण होऊन बाजारभाव या वर्षी तेजीत राहिले. त्याचा फायदा आम्हाला या वर्षी झाला आहे.- कमलाकर भोईर, मिरची उत्पादक शेतकरी, मलवाडा गाव