शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
2
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
3
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
4
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
5
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
6
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
7
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
8
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
9
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
10
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
11
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
12
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
13
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
14
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
15
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
16
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
17
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
18
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
19
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
20
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूच्या बाजारात चेन्नईचा आंबा, प्रतिकिलो १६० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 22:57 IST

युरोपातील निर्यातीसाठी २९ बागायतदार सज्ज; स्थानिक खवय्यांकडून खरेदीला प्राधान्य, चव उत्तम असल्याची चर्चा

- अनिरुद्ध पाटील बोर्डी : डहाणूच्या फळ बाजारात चैन्नईहून लालबाग नावाच्या आंब्याची आयात करण्यात आली असून त्याची १६० रु पये प्रतिकिलोने विक्री सुरू आहे. या जातीचे फळ आमरसाकरिता प्रसिद्ध असून त्याचा आस्वाद खवय्यांकडून घेतला जात आहे. तर मे महिन्याच्या मध्यात स्थानिक फळे पक्व होण्याची शक्यता असून २९ बागायतदारांनी युरोपीय देशात निर्यातीकरिता तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून एजन्सीकडे नोंदणी केली आहे.डहाणूच्या फळ बाजारात मार्च मिहन्याच्या पिहल्या आठवड्यापासून चैन्नईहून लालबाग जातीच्या आंब्याच्या एक-दोन पेट्यांची आयात विक्रेत्यांकडून करण्यात आली आहे. एका पेटीत २० किलो फळं असतात. शहरातील गौरीशंकर भगत या फळविक्रेत्यांनी त्या मागितल्या असून त्यांच्याकडून मोजक्या विक्रेत्यांकडेच तो उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. तर १६० रुपये प्रतिकिलोने विक्री असताना, त्याला खवय्यांकडून चांगला प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पहिल्या टप्यातील हापूसचे दर जास्त असल्याने तो अद्याप विक्री करिता आणला नसल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान दहा वर्षापूर्वी बोर्डी परिसरात होळीच्या मुहूर्तावर स्थानिक आंबा पक्व होऊन त्याची निर्यात झाली होती. वाणगाव मंडळात २०८.७२ हेक्टर, कासा १६९.३२ हेक्टर आणि डहाणू मंडळात २३९.२८ हेक्टर या प्रमाणे ६४७.३२ हेक्टर एकूण क्षेत्र केशर, हापूस, रायवळ, राजापुरी, तोतापूरी, पायरी आदि जातींच्या कलमांची लागवड आहे. मेच्या मध्यावर स्थानिक आंबा पक्व होणार आहे. याकरिता आंबा नेटच्या माध्यमातून स्थानिक बागायतदारांकरिता आंबा निर्यातीकरिता आवश्यक माहिती देण्यात आली आहे. शिवाय युरोपीय देशात या फळं एजंसीच्या माध्यमातून पाठविण्याकरिता तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत २९ बागायतदारांनी नोंद झाली आहे.स्थानिक आंबा एप्रिलअखेर पक्व होणारतलासरी तालुक्यातील झाई-बोरीगावचे कृषीभूषण यज्ञेश वसंत सावे हे आघाडीचे आंबा बागायतदार आहेत. त्यांचा पाच एकरातील आंबा २० ते २५ एप्रिल दरम्यान पक्व होणार असून मुंबई, उपनगर आणि स्थानिक पातळीवर तो उपलब्ध होईल. साधारणत: या वर्षीचा आंब्याचा हंगाम तीन टप्प्यात असेलत्यानुसार मध्य एप्रिल या पहिल्या टप्यात २५ टक्के आंबा, तर १० मे पर्यंत दुसऱ्या टप्यातील २५ टक्के आंबा असेल. त्यानंतर उर्वरित ५० टक्के आंबा उपलब्ध होईल. नेहमी प्रमाणे दुसऱ्या टप्यातील फळं विदेशात निर्यात केली जातील. त्यानुसार ते टप्पे पार पडणार आहेत.मार्चच्या पिहल्या आठवड्यात लालबाग जातीच्या आंब्याची आयात चेंनाईहून करण्यात आली असून 160 रु पये दरातून विक्र ी सुरू आहे. त्याला स्थानिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे.- गौरिशंकर भगत, आंबा विक्र ेता, डहाणू

टॅग्स :Mangoआंबा