बटलर यांच्या दानयात्रेची वाडा येथे झाली सांगता; विविध रुपात भरीव मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 11:58 PM2018-12-31T23:58:21+5:302018-12-31T23:58:31+5:30

यावेळी माईक बटलर व त्यांचे सहकारी डेरिल पर्सी व पंकज आंबवणे यांचे वाडा वासियांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

 Butler's donation went on here; Various help in various forms | बटलर यांच्या दानयात्रेची वाडा येथे झाली सांगता; विविध रुपात भरीव मदत

बटलर यांच्या दानयात्रेची वाडा येथे झाली सांगता; विविध रुपात भरीव मदत

Next

वाडा : ग्रामीण भागातील गोरगरीब व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून दानयात्रे साठी प्रसिध्द असणाऱ्या न्यूझीलंडमधील माईक बटलर यांच्या भारतातील ३ डिसेंबर ते २९ डिसेंबर या काळात महाराष्ट्रात निघालेल्या दानयात्रेची सांगता शनिवार दिनांक २९ रोजी वाडा शहरात झाली.
यावेळी माईक बटलर व त्यांचे सहकारी डेरिल पर्सी व पंकज आंबवणे यांचे वाडा वासियांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे, पंचायत समिती सभापती अश्विनी शेळके, उपसभापती मेघना पाटील जेष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी पल्लवी सास्ते, गटशिक्षणाधिकारी खोत पंचायत समितीचे सदस्य आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुंबईतून ३ डिसेंबर रोजी दादरच्या महापौर बंगल्यापासून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी झेंडा दाखविल्यानंतर या दान यात्रे ची सुरु वात झाली होती. माईक बटलर यांच्याबरोबर न्यूझीलंडमध्ये कार्यरत असणारे डेरिल पर्सी, वाड्यातील मुळ रहिवासी असलेले आयटी अभियंता पंकज आंबवणे व त्यांचे सहकारी या यात्रेत सहभागी झाले होते. या दान यात्रेमधून मिळालेल्या आर्थिक मदतीमधून वाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या आदिवासी बहुल वरसाळे, दाढरे, आमगाव, नाकाडपाडा, करंजपाडा, या शाळांना प्रयोगशाळेसाठी आवश्यक असणारे मायक्रोस्कोप, रासायनिक पदार्थ, टेबल, कपाट आदी साहीत्यांसह संगणक, खेळाचे साहित्य व पुस्तके इत्यादी शैक्षणिक मदत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात आली.यात्रेचे चांगल्या प्रकारे नियोजन करणारे जेष्ठ पत्रकार महेश म्हात्रे व यात्रे दरम्यान सहकार्य करणाºयाचे विशेष आभार मानले. तर भारतात होणारा चॅरिटी वॉक चा अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे, त्याला लोकांनी दिलेला पाठिंबा पहाता आपल्या समाजात एक चांगला पायंडा पडेल अशी प्रतिक्रिया जेष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त
केली.

यात्रेला मिळाला प्रतिसाद
बटलर न्यूझीलंड मध्ये दान यात्रेत चालत असतांना त्यांच्या संस्थेच्या खात्यात आॅनलाइन मदत पडते. मुंबईतून निघालेल्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत गेला आणि जागोजागी लोक मदतीसाठी पुढे येत होते. दरम्यान बटलर यांनी या दानयात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले.

Web Title:  Butler's donation went on here; Various help in various forms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.