अर्नाळा येथे बसची रिक्षाला जोरदार धडक, एका महिला प्रवाशाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 14:43 IST2025-06-22T14:37:58+5:302025-06-22T14:43:24+5:30

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अर्नाळा येथील सोसायटी नाक्यावर दोन प्रवासी महिला यांना घेऊन महिला रिक्षाचालक या नाक्यावरून विरारकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या अर्नाळा शिर्डी या एसटीने या रिक्षाला जोरदार धडक दिली.

Bus hits auto-rickshaw in Arnala, woman passenger dies | अर्नाळा येथे बसची रिक्षाला जोरदार धडक, एका महिला प्रवाशाचा मृत्यू 

अर्नाळा येथे बसची रिक्षाला जोरदार धडक, एका महिला प्रवाशाचा मृत्यू 


पारोळ अर्नाळा ते शिर्डी येथे जाणाऱ्या एसटी बसने एका प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिल्याने या रिक्षातील प्रवासी महिला जागीच ठार झाली. रिक्षा चालकासह तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून ही घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. या अपघातात प्रवासी महिला कविता कोलगे यांचा मृत्यू झाला आहे. तर रिक्षाचालक पूनम वरठे व प्रवासी कल्पना पाटील या गंभीर जखमी झाल्या असून या ठिकाणी उभे असलेले दिनेश जयस्वाल व सोनू खान हे किरकोळ जखमी झाले आहेत.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अर्नाळा येथील सोसायटी नाक्यावर दोन प्रवासी महिला यांना घेऊन महिला रिक्षाचालक या नाक्यावरून विरारकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या अर्नाळा शिर्डी या एसटीने या रिक्षाला जोरदार धडक दिली. या फुल विक्रेत्या असलेल्या कविता कोलगे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद अर्नाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे 

अर्नाळा आगारात बस वेळेवर सुटत नसल्याने अपघात -
अर्नाळा आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या वेळेवर सुटत नसल्याने तो लांबचा पल्ला गाठण्यासाठी चालक वेगात बस चालवत असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे अर्नाळा येथून शिर्डी येथे जाणारी बस सात वाजता सुटते मात्र ती एक तास उशिराने सुटल्याने पुढचा पल्ला वेळेतच गाठता यावा चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

Web Title: Bus hits auto-rickshaw in Arnala, woman passenger dies