शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

धुंदलवाडी आंबेसरीला जोडणारा पूल कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 5:43 AM

धुंदलवाडी आणि आंबेसरीला जोडणारा बारीपाडा येथील पन्नास वर्षे जुना पूल सोमवार, १६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान कोसळल्याने दळणवळण ठप्प झाले.

डहाणू/बोर्डी : आशागड मार्गे धुंदलवाडी आणि आंबेसरीला जोडणारा बारीपाडा येथील पन्नास वर्षे जुना पूल सोमवार, १६ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान कोसळल्याने दळणवळण ठप्प झाले. सुदैवाने जीवितहानी वा वाहनांचे नुकसान झाले नसल्याची माहिती डहाणू सार्वजनिक बांधकाम उप विभागाकडून देण्यात आली. हा पूल पन्नास वर्षे जुना होता.रविवारी तालुक्याला पावसाने झोडपल्याने ढगफुटी होऊन २१६ मिमी पाऊस झाला. त्यामुळे ३.७० मीटर रुंदीचा आणि सहा मीटरचे दोन गाळे असलेला हा पूल दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास कोसळल्याने दळणवळण ठप्प झाल्याची माहिती डहाणू सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे सहायक उपअभियंता श्रेणी १ चे धनंजय जाधव यांनी दिली. याबाबतची माहिती कळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासात घटनास्थळ गाठले. मंगळवारी पुन्हा पुलाची पाहणी केली जाणार असून बाराशे मीटरच्या पाइपच्या साहाय्याने तत्काळ उपाययोजना करून दोन-तीन दिवसांत वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ ला जोडणाºया मार्गावरील दळणवळण आणि या मार्गाने गुजरातच्या संजाण, उंबरगाव या शहराकडील वाहतूक प्रभावित होणार आहे.दरम्यान, या मार्गावर ५० किमी लांबीचा नवीन रस्ता बांधण्याचा अंदाजपत्रकात समावेश असून त्याअंतर्गत नवीन पुलाचे बांधकाम पावसाळ्यानंतर केले जाईल, असेही ते म्हणाले. रविवारी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असला तरी सोमवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली. शिवाय ऊन असल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.