शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांचे मृतदेह किनाऱ्यावरच पुरले, आपत्ती व्यवस्थापनाकडे कर्मचारी नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 05:47 IST

तीन दिवसांपूर्वी नालासोपारा येथून केळवेला फिरायला आलेल्या सातपैकी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. दीपक चलवादी, दीपेश पेडणेकर, श्रीतेज नाईक, तुषार चिपटे अशी त्यांची नावे होती.

पालघर : तीन दिवसांपूर्वी नालासोपारा येथून केळवेला फिरायला आलेल्या सातपैकी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. दीपक चलवादी, दीपेश पेडणेकर, श्रीतेज नाईक, तुषार चिपटे अशी त्यांची नावे होती. त्यातील दीपक आणि तुषारचा शोध सोमवारी लागला होता. मंगळवारी दुपारी श्रीतेजचा मृतदेह वडराईला, तर दीपेशचा मृतदेह संध्याकाळी दादरा पाड्याच्या किनाºयावर अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. त्या मुलांचा शोध वेळीच न लागल्याने, त्यांच्या कुटुंबीयांना किनाºयावरच दोघांची प्रेते पुरावी लागली.केळवे पोलीस स्थानिकांच्या मदतीने दिवसरात्र त्यांचा घेत होते. मात्र, अपुºया व्यवस्थेमुळे त्यांचा शोध घेण्यात अपयश आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे, तरी वसई-विरारच्या अग्निशामक दलाचे दोन जवान फक्त हातात बॅटरी घेऊन मुलांचा शोध घेत होते. या व्यतिरिक्त या विभागाने कुठलीही यंत्रणा उभी केलेली नव्हती. माझ्याकडे स्टाफच नसल्याने मी काय करू, असे आपत्ती विभागाचे प्रमुख कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.घटनेच्या दिवशी तहसीलदार महेश सागर यांच्या भेटी व्यतिरिक्त एकही अधिकारी, लोकप्रतिनिधी घटनास्थळी फिरकलेला नसल्याने, स्थानिकांमधून संतप्त नाराजी व्यक्त केली जात आहे. सहा.पो.नी.काळे हे सागर गोवारी, मंगेश वळवी, राजू मेहेर, सुरेश पडवळे, जगदीश पडवळे, ज्ञानेश्वर सुतार, संगम गोवारी, राजेश मोरे आदी स्थानिक मच्छीमारांच्या टीमच्या सहकार्याने शोध घेत होते. कोस्टगार्ड दमणकडून चेतक हेलिकॉप्टर आणि त्यांची बोट बुडालेल्या तरुणांचा शोध घेत असल्याची माहिती कोस्ट गार्डचे अधिकारी देत असले, तरी घटनेपासून सोमवारपर्यंत असे कुठलेही हेलीकॉप्टर अथवा बोट केळवे किनारपट्टीजवळ कुठेही दिसली नसल्याचे स्थानिकांनी ‘लोकमत’ला सांगितले.