मी शंकर, तू माझी पार्वती; वसईतही भोंदूबाबा, अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने पुण्यातील महिलेवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 07:02 IST2026-03-27T07:01:58+5:302026-03-27T07:02:26+5:30

पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

bhondu baba in vasai pune woman tortured on pretext of teaching spirituality | मी शंकर, तू माझी पार्वती; वसईतही भोंदूबाबा, अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने पुण्यातील महिलेवर अत्याचार

मी शंकर, तू माझी पार्वती; वसईतही भोंदूबाबा, अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने पुण्यातील महिलेवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : 'मी शंकर असून तू माझी पार्वती आहे,' असे सांगून एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषीकेश वैद्य याच्याविरोधात वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

पीडित महिला ३५ वर्षांची असून पुण्यात राहते. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार २०२३ मध्ये तिची ओळख वसईतील ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली. त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. डिसेंबर २०२३ मध्ये तो तिला भेटायला पुण्यात गेला. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला.

अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढले ?

वैद्य याने तिची अश्लील छायाचित्रे काढली होती. या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून पुन्हा भेटायला बोलावले. मे २०२५ मध्ये वसईतील हॉटेलमध्ये भेटायला बोलावून पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. नाशिकच्या खरात याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर महिलेने हिंमत दाखवून आपल्या पतीला हा प्रकार सांगितला. ऋषीकेश वैद्य याने धर्मगुरू असल्याचे भासवून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे पीडित महिलेने सांगितले.
 

Web Title: bhondu baba in vasai pune woman tortured on pretext of teaching spirituality