आरोपीला नेत असताना भाईंदर पोलिसांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 07:42 IST2024-03-01T07:42:07+5:302024-03-01T07:42:16+5:30

पोलिस गणेश देवलनगरमधील गल्ली क्र. २ मध्ये तिवारी चाळीत बुधवारी रात्री गेले होते.

Bhayander police beat while taking the accused | आरोपीला नेत असताना भाईंदर पोलिसांना मारहाण

आरोपीला नेत असताना भाईंदर पोलिसांना मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क 
मीरा रोड : दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ओळख पटलेल्या एका अल्पवयीन आरोपीचा शोध घेण्यास आलेल्या भाईंदर पोलिस ठाण्यातील दोघा पोलिसांना भाईंदरच्या गणेश देवलनगर झोपडपट्टीत एकाने ठोशा-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. 

भाईंदर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई सुशीलकुमार पवार (३४) व सलमान पटवे हे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी दिलेल्या निर्देशानुसार दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंदाजे १६ ते १७ वर्षांचा दुचाकी चोरी करणारा संशयित युवक दिसून आला.

पोलिस गणेश देवलनगरमधील गल्ली क्र. २ मध्ये तिवारी चाळीत बुधवारी रात्री गेले होते. त्याला ताब्यात घेत असताना त्या ठिकाणी अयोध्या मिश्रीलाल गुप्ता (मूळ रा. गाझीपूर, उत्तर प्रदेश) हा आला. त्याने आरडाओरडा करत गल्लीतील लोकांना गोळा केले. पोलिसांची कॉलर धरली. त्यांना धक्काबुक्की करत चापट्या मारत व बुक्क्यांनी मारहाण केली. शिपाई सलमान पटवे हे पुढे आले असता त्यांनादेखील पोटात बुक्के मारून ढकलून दिले. पोलिसांना अर्वाच्च शिव्या देत अरेरावी केली. 

Web Title: Bhayander police beat while taking the accused

टॅग्स :Policeपोलिस