Be Careful, Don't forced to pay a donation for Ganeshotsav | जबरदस्तीने वर्गणी वसूल कराल तर सावधान, खंडणीचा गुन्हा ?
जबरदस्तीने वर्गणी वसूल कराल तर सावधान, खंडणीचा गुन्हा ?

नालासोपारा : गणेशोस्तव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. सर्वत्र मंडळाची गणपतीची तयारी सुरु असून दरवर्षीप्रमाणे गल्लीबोळातील मंडळे व्यापाऱ्यांकडून, राजकीय पक्षांची नेतेमंडळी, रहिवाशांकडून, बिल्डरांच्या कार्यालयातून तसेच समाजसेवकांकडून वर्गणी गोळा करतात. पण मंडळांनी वर्गणी गोळा करताना कोणालाही दमदाटी, मारहाण किंवा शिवीगाळ करत अव्वाच्या सव्वा मागणी केल्याची एखादी जरी तक्र ार पोलीस स्टेशनला आल्यास मंडळ आणि मंडळाच्या पदाधिकाºयासह ज्याच्याविरूद्ध फिर्यादी तक्रार देईल त्याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

वसई तालुक्यात असलेल्या प्रत्येक मंडळांनी धर्मदाय आयुक्तांकडून नोंदणी केलेली असावी. ज्यांची नोंदणी नसेल त्या मंडळांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपली मंडळे रजिस्टर करावीत. ज्यांची नोंदणी नसेल त्यांना गणेशोस्तव करण्यासाठी पोलीस ठाणे कोणतीही परवानगी देणार नसल्याची तंबी दिली आहे. सर्व मंडळाची तपासणीही करण्यात येणार आहे. रस्त्यावर मंडप घालताना वसई विरार महानगरपालिकेची परवानगी घेणेही आवश्यक असून योग्य ती कागदपत्रे पोलीस ठाण्यात दिली, तर त्याच मंडळांना परवानगी मिळेल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वसई तालुक्यात लहान व मोठी अशी मिळून शेकडो मंडळे अधिकृत आहेत.

रात्री १० नंतर स्पीकर सुरु असल्यास आयोजक आणि वादकांवर कारवाई करणार आहे. गणेशोस्तव काळात सर्व मंडळानी आवाजाची मर्यादा पाळायची आहे. याचा भंग केल्यास त्विरत अटक, ५ वर्षाची शिक्षा, १ लाख रूपये दंड आणि सामानही जप्ती केली जाईल अशा प्रकारे पोलीस कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. शांतता झोन मधे (शाळा, रु ग्नालये आणि इतर) ५५ डेसिबल, निवासी झोनमधे ५५ डेसिबल, वाणज्यि झोनमधे ६५ डेसिबल आणि ओद्योगिक झोनमधे ७५ डेसिबल अशी आवाजाची मर्यादा आखुन दिली आहे. शासनाने आणि न्यायालयाने दिलेल्या अटी व् शर्तीन्चेही पालन करावे असे गणेश मंडळांना आव्हानही केले आहे. एक वाडी एक गणपती साजरे करा असे दरवर्षी आव्हानही केले जाते पण याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत एका पोलीस अधिकाºयाने व्यक्त केली आहे.

जर कुठल्याही मंडळाने जबरदस्ती वर्गणी गोळा केल्याच्या तक्र ारी आल्या तर त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले जातील. ज्या मंडळाची कागदपत्रे व्यविस्थत असतील अशा मंडळांना परवानगी देण्यात येईल. मंडळाचे रजिस्ट्रेशन पण तपासले जाणार आहे. मंडळानी दमदाटी व शिवीगाळ करत जोरजबरदस्तीने वर्गणी गोळा
करू नका.
- विजयकांत सागर,
अप्पर पोलीस अधीक्षक, वसई


Web Title: Be Careful, Don't forced to pay a donation for Ganeshotsav
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.