शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
5
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
6
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
7
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
8
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
9
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
10
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
11
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
12
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
13
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
14
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
15
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
16
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
17
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पाणेरी बचाने की जंग में हम सब संग में - जलपुरूष राजेंद्र सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 00:28 IST

आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलाबाळांसाठी घर, संपत्ती, जमिनीची तजवीज करणाऱ्यांनी त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही.

पालघर : आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलाबाळांसाठी घर, संपत्ती, जमिनीची तजवीज करणाऱ्यांनी त्यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला वारसा म्हणून शुद्ध पाण्याची तरतूद करणे हेच आपले मुख्य कर्तव्य आहे या शब्दात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ जलपुरु ष डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी पाण्याचे महत्त्व विशद केले.पाणेरी नदी प्रदूषणाविरुद्ध माहीमवासींनी सुरू केलेल्या चळवळीच्या अनुषंगाने सोमवारी आयोजित एका जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. सकाळी पाणेरी नदीच्या उगमापासून शेवटपर्यंतच्या भागाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यानंतर दुपारच्या जाहीर व्याख्यान्यात त्यांनी पानेरी नदीच्या पुनर्जीवितासंबंधी व एकंदर पाणी प्रश्नावर उपस्थितांना संबोधित केले.पाणेरी नदीची स्थिती अत्यंत खराब असून नदीवर होत असलेला अन्याय हा समाजावरील अन्याय म्हणायला हवा कारण नदीच्या आरोग्याशी आपले आरोग्य निगिडत असल्याने नदी आजारी पडल्यास आपणही आजारी पडतो हे सांगताना डॉ. सिंह यांनी गंगा नदीच्या प्रदूषणाचा दाखला दिला. गंगा प्रदूषणामुळे कानपूर ते कनोजपर्यंतच्या भागात भारतातील सर्वाधिक कर्करोग रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.नदीत एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण असतांनाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र हे पाणी पिण्यायोग्य असल्याचा खोटा अहवाल देते. म्हणून सरकारमान्य खाजगी प्रयोगशाळांच्या सहकार्याने नदीतील पाण्याचे नमुने तपासणी करून महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला उघडे पाहायला हवे असे आवाहनही डॉ. सिंह यांनी केले. पाणेरी नदीच्या प्रदूषणाविरु द्धच्या आंदोलनात काही प्रमुख मुद्यावर त्यांनी विशेष भर दिला त्यानुसार पाणेरी नदीचे शासन दप्तरी योग्य नामकरण करणे गरजेचे असून पानेरी खाडी असा चुकीच्या उल्लेखात सुधारणा करून ‘पाणेरी नदी’ हा बदल जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अधिकार वापरून करावा. यासाठी ग्रामपंचायतीतर्फे निवेदन देणे, पाणेरी नदीची श्वेतिपत्रका तयार करून नदी कोणामुळे, कधीपासून आणि कुठपासून आजारी आहे याची माहिती सर्वांना करून देणे तसेच जिल्हाधिकाऱ्यांंना नदीची ओळख तिचे सीमांकन आणि चिन्हांकन करून घ्यायला भाग पाडणे या मुद्द्यांवर सर्वप्रथम काम करायला हवे असे सांगितले. तसेच नदीवरील अतिक्र मण, प्रदूषण आणि शोषण या तीन संकटांपासून नदीचे संरक्षण करण्यासाठी मेहनत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :palgharपालघर