युद्धपातळीवरील प्रयत्नांनंतर सूर्याच्या नवीन योजनेतून वसई-विरारचा पाणीपुरवठा 11 तासांनी पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 04:45 PM2021-06-06T16:45:09+5:302021-06-06T16:45:39+5:30

Vasai-Virar News: "मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडे गावा नजीक टोल नाक्याजवळ सूर्याच्या नवीन जलवाहिनीला शनिवारी सकाळी 10 वाजता गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले होते "

After the war effort, water supply to Vasai Virar was restored by 11 hours under Surya's new scheme | युद्धपातळीवरील प्रयत्नांनंतर सूर्याच्या नवीन योजनेतून वसई-विरारचा पाणीपुरवठा 11 तासांनी पूर्ववत

युद्धपातळीवरील प्रयत्नांनंतर सूर्याच्या नवीन योजनेतून वसई-विरारचा पाणीपुरवठा 11 तासांनी पूर्ववत

Next

-आशिष राणे 
वसई - मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडे गावानजीक टोल नाक्याजवळ शनिवार दि.5 जून  सकाळी 10 च्या सुमारास सुर्याची नवीन मुख्य जलवाहिनी फुटल्याने लागलीच युद्धपातळीवर तिच्या दुरुस्तीचे काम वसई विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाने हाती घेत ते काम जवळपास 11 तासांच्या अथक प्रयत्नाने शनिवारी रात्रींच 9 च्या सुमारास  पूर्ण करून सूर्याचा  वसई विरारचापाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रकाने लोकमत ला दिली.

मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडे गावानजीक टोल नाक्याजवळ सूर्याच्या नवीन मोठ्या जलवाहिनीला जमिनीत खोलवर मोठी गळती होऊन लाखो लिटर पाणी शनिवारी सकाळ पासूनच वाया  गेले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी वसई विरार महापालिकेच्या  पाणीपुरवठा विभागाला तक्रार केल्यावर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गानी धाव घेत युद्धपातळीवर तिच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू केलं होतं 

दरम्यान या दुरुस्तीच्या काळात सूर्याच्या जुन्या योजनेतुन वसईतील पाणीपुरवठा सुरू होता मात्र तो कमी दाबाने सुरू राहिला होता. मात्र आता 11 तासांच्या अथक प्रयत्न करित  हे काम पूर्ण झाले असून रविवार पासून दोन्ही नवीन व जुन्या योजनेतुन पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाल्याची  माहिती पाणीपुरवठा विभागाने रविवारी दुपारी लोकमत ला दिली.

Web Title: After the war effort, water supply to Vasai Virar was restored by 11 hours under Surya's new scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.