अत्याचार करणाऱ्या बापावर ‘पॉक्सो’द्वारे कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 06:35 IST2018-11-11T06:35:31+5:302018-11-11T06:35:50+5:30
अत्याचार करणाऱ्या बापावर ‘पॉक्सो’द्वारे कारवाई

अत्याचार करणाऱ्या बापावर ‘पॉक्सो’द्वारे कारवाई
भिवंडी : शहरातील पद्मानगर भागात राहणाºया कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर तिच्या जन्मदात्यानेच अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलीने पोलिसांकडे केल्यानंतर पोलिसांनी बापावर पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई करत तुरुंगात पाठवले आहे. हा आरोपी पन्नास वर्षांचा असून तो पत्नी आणि दोन मुलींसह पद्मानगर येथे कामगार वस्तीत राहतो.
c तसेच या घटनेची वाच्यता केल्यास आई आणि बहिणीला ठार मारण्याची धमकी दिली. भयभीत झालेल्या पीडित मुलीच्या बापानेच गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याचा त्रास असह्य झाल्याने तिने गुंगीचे औषध खाण्यास नकार दिला. त्यामुळे बापाने तिला मारहाण केली.