पालघरजवळ तिहेरी अपघात, मुंबईतल्या सहा जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 18:16 IST2019-05-10T18:16:03+5:302019-05-10T18:16:25+5:30

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एक बाईक यांचा भीषण अपघात झाला आहे.

accidents on the Mumbai-Ahmedabad national highway, the death of six people | पालघरजवळ तिहेरी अपघात, मुंबईतल्या सहा जणांचा मृत्यू 

पालघरजवळ तिहेरी अपघात, मुंबईतल्या सहा जणांचा मृत्यू 

मुंबई- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एक बाईक यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारसमोर बाईकस्वार आल्याने हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.  आकाश चव्हाण( 42) बोरिवली, नवनाथ रामकांत नवले(25) मोखाडा, भागवत दगडू जाधव (50) पनवेल, प्रतिमा परिमल शहा (70) कांदिवली, राकेश प्रवीण लाला शहा (50) कांदिवली, दिलीप मधुकर चंदानी (30) पनवेल हे सहा जण मृत तर दोन जखमी होते. 

Web Title: accidents on the Mumbai-Ahmedabad national highway, the death of six people