माजी आमदार विवेक पंडित यांच्या गाडीला वसईत अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 02:21 PM2019-11-16T14:21:55+5:302019-11-16T14:22:42+5:30

किरकोळ दुखापत वगळता माजी आमदार सुखरूप; मात्र गाडीचे मोठे नुकसान

Accident in the vehicle of former MLA Vivek Pandit | माजी आमदार विवेक पंडित यांच्या गाडीला वसईत अपघात

माजी आमदार विवेक पंडित यांच्या गाडीला वसईत अपघात

googlenewsNext

आशिष राणे 

वसई - श्रमजीवी संघटनेचे संस्थापक तथा राज्य आढावा समितीचे अध्यक्ष माजी आम.विवेक भाऊ पंडित यांच्या गाडीला शुक्रवारी रात्री 9.20 मिनीटांनी अपघात झाला असल्याची घटना समोर आली आहे. नशीब बलवत्तर म्हणून माजी आम,विवेक पंडित या अपघातातून बाल बाल  बचावले आहेत, तर पंडित यांना किरकोळ दुखापत वगळता त्यांच्या  इन्व्होवा गाडीचे मात्र मोठं नुकसान झाले आहे. 

सविस्तर माहिती नुसार शुक्रवारी संध्याकाळी उशिरा 9.20 च्या सुमारास विवेक पंडित वसई महामार्गावर असलेल्या चिंचोटी परिसरातील बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम आटपून घोडबंदरकडे परतत असताना, त्यांच्या एम.एच 04 जे बी 8721 या इन्व्होवा गाडीला पाठी मागून भरधाव येणाऱ्या एका फॉर्चूनर गाडीने जोरदार धडक दिली. घोडबंदर पुलाच्या आधी असणाऱ्या इंडियन ऑईल पेट्रोलपंप जवळ हा अपघात घडला.

या अपघात विवेक पंडित यांना मुका मार लागला असून काही प्रमाणात किरकोळ दुखापत ही झाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच यासंदर्भात पंडित यांच्या गाडीला अपघात झाल्याच्या घटनेबाबतीत चुकीच्या माहितीचा संदेश सोशल मिडियावर रात्रीपासूनच अफवा पसरवल्या जात होत्या. मात्र, मी सुखरूप आहे, त्यामुळे अन्य काही या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पंडित यांनी एका व्हिडीओ व संदेशाद्वारे केले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका,
या संदर्भात पंडित यांचे सहकारी प्रमोद पवार यांनी माजी आमदार विवेक भाऊ सुखरूप असल्याचे माध्यमाना सांगितले असून हा अपघात गाडीला मोठे नुकसान करणारा असला तरी विवेक पंडित त्यांच्या उसगाव याठिकाणी अगदी सुखरूप असून सुलतान भाई हे सहकारी पंडित यांसोबत होते, तेही सुखरूप आहेत. त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. हजारो दुखीतांचे अश्रू पुसणाऱ्या विवेक पंडितांना लोकांचे अनेक आशीर्वाद लाभल्याने ते या अपघातातून बाल बाल बचावल्याची प्रतिक्रिया प्रमोद पवार यांनी विवेक पंडित यांच्यावतीने दिली. सोबत विवेक पंडित यांनी मी सुखरूप असल्याचा व मला भेटायचे असेल तर उसगावच्या फार्म हाऊसवर यावे, असेही पंडित यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हंटलं आहे.

Web Title: Accident in the vehicle of former MLA Vivek Pandit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.