चारोटी टोल नाक्याजवळ बस आणि कंटेनरमध्ये अपघात, 15 जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 13:59 IST2021-02-02T13:59:34+5:302021-02-02T13:59:53+5:30
यामध्ये चालक गंभीर जखमी झाला तर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

चारोटी टोल नाक्याजवळ बस आणि कंटेनरमध्ये अपघात, 15 जखमी
कासा - डहाणू तालुक्यातील चारोटी टोल नाक्याजवळ रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास लक्झरी बस व कंटेनर मध्ये महामार्गावर अपघात होऊन चालक व 14 प्रवासी जखमी झाले आहेत
जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लक्झरी बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखत उभा असलेल्या एका कंटेनरला धडक दिली त्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला तर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.