मांजरावर अंत्यसंस्कार केल्याने ६ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 13:51 IST2024-01-05T13:51:32+5:302024-01-05T13:51:32+5:30

स्मशानभूमीत मृत मानवी देहांवर दहनविधीचे अंत्यसंस्कार केले जातात.

A case has been registered against 6 people for cremating a cat | मांजरावर अंत्यसंस्कार केल्याने ६ जणांवर गुन्हा दाखल

मांजरावर अंत्यसंस्कार केल्याने ६ जणांवर गुन्हा दाखल

मीरा रोड : भाईंदर पश्चिम येथील पालिकेच्या स्मशानभूमीत मृत मांजरावर अंत्यसंस्कार केले गेलेत. त्यामुळे पालिकेने दिलेल्या फिर्यादीवरून स्मशानभूमीतील चार ठेका कमर्चारी व पेट हेवन्स या प्राणीमित्र संघटनेच्या दोघा चालकांवर भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्मशानभूमीत मृत मानवी देहांवर दहनविधीचे अंत्यसंस्कार केले जातात. दहनविधीसाठी ठेक्याचे कर्मचारी पालिकेने नेमलेले आहेत. शेगडीवर लाकडे रचून त्यावर मांजर ठेवून अंत्यविधी केला होता. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली होती. या घटनेप्रकरणी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक अरविंद चाळके यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर गुन्हा नोंदवला आहे. 

 

Web Title: A case has been registered against 6 people for cremating a cat