शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ७८ उमेदवार, १०३ अर्ज

By admin | Updated: September 27, 2014 00:14 IST

युती आणि आघाडीतील पक्षांनी वेगवेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील १० आजी-माजी आमदारांनी उमेदवारी अर्ज भरले.

ठाणे : युती आणि आघाडीतील पक्षांनी वेगवेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी ठाणे जिल्ह्यातील १० आजी-माजी आमदारांनी उमेदवारी अर्ज भरले. जिल्ह्यातील १८ मतदारसंघांतून ७८ उमेदवारांनी १०३ निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले. उमेदवारांनी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले. कल्याण पश्चिममध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आहे़बुधवारी सर्वपित्री अमावस्या संपताच बुधवारी ९ उमेदवारांनी १२ अर्ज तर गुरुवारी जिल्ह्यातून २६ उमेदवारांनी ३६ अर्ज भरले होते. शुक्रवारी ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, ओवळा-माजिवडा संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक, मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आसीफ शेख, कोपरीतून शिवसेनेचे विद्यमान आमदार एकनाथ शिंदे, भाजपाचे माजी नगरसेवक संदीप लेले, कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेतर्फे माजी आमदार सुभाष भोईर, मनसेचे विद्यमान आमदार रमेश पाटील, मुरबाडमधून भाजपातर्फे विद्यमान आमदार किसन कथोरे, शिवसेनेचे वामन म्हात्रे, राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार गोटीराम पवार, कल्याण पश्चिममधून मनसेचे विद्यमान आमदार प्रकाश भोईर, अंबरनाथमधून विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच शहापूरमधून बहुजन विकास आघाडीतर्फे आदिवासी नेते गोपाळ रेरा, तर बेलापूरमधून माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी अर्ज भरले आहेत.