60-year-old woman ends her life by jumping off the skywalk in vasai road | स्कायवॉकवरून उडी मारून 60 वर्षीय महिलेनं संपवलं जीवन, आत्महत्येचं गूढ कायम

स्कायवॉकवरून उडी मारून 60 वर्षीय महिलेनं संपवलं जीवन, आत्महत्येचं गूढ कायम

वसई - वसई रोड पश्चिमेच्या नवघर भागात असलेल्या स्कायवॉकवरून एका 60 वर्षीय अनोळखी महिलेने उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (19 फेब्रुवारी) सकाळी 7.30 च्या सुमारास ही घटना घडली असून आत्महत्येचं गूढ कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसई रोड नवघर येथील वाहतूक शाखेच्या समोर असलेल्या अंबाडी रोड चौकाजवळ हा स्कायवॉक आहे. या स्कायवॉकवरून सकाळी 7.30 च्या सुमारास 60 वर्षीय महिलेने उडी मारली.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ माणिकपूर पोलीस दाखल झाले. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. अखेर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी नवघर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही महिला कोण आहे?, तिचे नाव, गाव काय अथवा तिची नेमकी ओळख अद्याप पटू शकली नसून तिने ही आत्महत्या का केली? अथवा ही हत्या आहे का?  याचंही खरं कारण समजू शकलं नाही. या घटनेनंतर सर्वत्र वसई परिसरात खळबळ माजली असून आता या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलीस चौकशी करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

भारतातल्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; यंदा मिळणार 'इतकी' पगारवाढ

भारतासोबत ट्रेड डील करण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीच उपस्थित केली शंका

Jammu And Kashmir : त्राल चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

७३ हजार लोकांना संसर्ग; कोरोनाचे १९०० बळी

भूखंडाचे श्रीखंड : सरकारी जमीन लाटली, आम्ही नाही पाहिली

English summary :
60-year-old woman ends her life by jumping off the skywalk in vasai road

Web Title: 60-year-old woman ends her life by jumping off the skywalk in vasai road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.