५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून, फरार आरोपीला १८ वर्षानंतर उत्तर प्रदेश येथून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 18:57 IST2025-12-13T18:56:22+5:302025-12-13T18:57:56+5:30
खुनाच्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते.

५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून, फरार आरोपीला १८ वर्षानंतर उत्तर प्रदेश येथून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- ५ वर्षाच्या मुलीचे अपहरण, बलात्कार, निर्घृण खून करुन फरार आरोपीला १८ वर्षानंतर उत्तरप्रदेश येथून गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी व सपोनि शिवकुमार गायकवाड यांनी शनिवारी दिली आहे.
२००७ साली सातीवलीच्या यादव कंपाऊंड येथील चाळीत राहणाऱ्या ५ वर्षाच्या अल्पवयीन चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर जबरी संभोग करुन तिला मारहाण करुन डावे गालावर, नाकावर दुखापती करुन तिचा गळा आवळून जीवे ठार मारले होते. याप्रकरणी माणिकपुर पोलीस ठाण्यात आरोपी नंदलाल उर्फ नंदु रामदास विश्वकर्मा (२२) याच्याविरुद्ध १ एप्रिल २००७ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो आरोपी तेव्हापासून फरार होता. पोलीस आयुक्तालयात घडलेल्या व उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते.
या गुन्ह्याचा गुन्हे शाखा दोनने नव्याने समांतर तपास करुन गुन्ह्याच्या त्यावेळी हजर असलेले घटनास्थळावरील साक्षीदार यांच्याकडे आरोपीचा तपास केला. तसेच आरोपीचे उत्तरप्रदेश येथील मूळ गावी बातमीदाराकडून माहीती प्राप्त केली. आरोपी हा त्याच्या मूळ गावी वास्तव्य लपत फिरत असल्याची माहीती सहाफौज रविंद्र पवार यांना मिळाली होती. सदर आरोपीच्या प्राप्त माहीतीचे आधारे व कौशल्यपूर्ण तपासाव्दारे उत्तर प्रदेशच्या जिल्हा सिध्दार्थ नगर, ईटावा तालुक्यातील खरदौरी येथे तपास पथक रवाना करुन आरोपीला १० डिसेंबरला अटक करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सपोनिरी सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, अजित गिते, सहाफौज संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोहवा प्रफुल्ल पाटील, प्रशांतकुमार ठाकुर, सचिन पाटील, जगदिश गोवारी, दादा आडके, राहूल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, अक्षय बांगर, मसुब/रामेश्वर केकान तसेच सायबर शाखेचे सहाफौज संतोष चव्हाण यांनी केली आहे.