पालघरमध्ये ४० कोटींचे अमलीपदार्थ जप्त, सहा-सात वर्षांपासून सुरू होता कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 04:59 IST2017-10-05T04:58:09+5:302017-10-05T04:59:19+5:30
येथील दापचारी दुग्ध प्रकल्पात असलेल्या एका कृषी क्षेत्रात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी मंगळवारी रात्री टाकलेल्या छाप्यात ४० कोटी रु पयांचे हेरॉईन, एमडीएमके असे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले.

पालघरमध्ये ४० कोटींचे अमलीपदार्थ जप्त, सहा-सात वर्षांपासून सुरू होता कारभार
तलासरी : येथील दापचारी दुग्ध प्रकल्पात असलेल्या एका कृषी क्षेत्रात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी मंगळवारी रात्री टाकलेल्या छाप्यात ४० कोटी रु पयांचे हेरॉईन, एमडीएमके असे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. छापा घालताना झालेल्या गोंधळात तीन आरोपी पोलिसांच्या हातून निसटले असून, त्यांचा शोध सुरू आहे.
माणिकपूर पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी टाकलेल्या एका छाप्यात तीन आरोपींसह अमलीपदार्थ जप्त केले होते. या प्रकरणाचा तपास करीत असताना पकडलेल्या सर्फराज युसुब, सोहेल युसुब व कुचेंन (नायजेरियन नागरिक) या आरोपींकडून दापचारी दुग्ध प्रकल्पातील एका कृषी क्षेत्रात असलेल्या अमलीपदार्थाच्या साठ्याबाबत माहिती मिळाली होती. त्या आधारे पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या अशोक होनमाणे व पथकाने कृषी क्षेत्र क्र मांक १२४मध्ये छापा घालून हा अमलीपदार्थांचा साठा जप्त केला. त्यात पाच किलो दोनशे ग्रॅम अफगाणी हेरॉईन असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २६ कोटी रुपये आहे. तसेच २४.६९० किलो एमडीएमके सापडले असून, त्याची किंमत १० कोटी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून एक गाडीही जप्त करण्यात आली आहे.