शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

३२ एसटी बसेस, २ बोटींसह १२० वाहनांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 00:51 IST

बोईसर मतदारसंघातील वाहनव्यवस्था

- पंकज राऊतबोईसर : मतदानासाठी रविवार आणि सोमवार असे सलग दोन दिवस एसटीच्या ३२ बसेस आणि २ बोटींसह एकूण १२० विविध वाहनांचा बोईसर मतदारसंघात वापर करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या माध्यमातून एसटीला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार असून एवढ्या मोठ्या प्रमाणात बसेस निवडणुकीच्या कामासाठी देण्यात आल्याने नियमित फेऱ्या रद्द करणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या अधिपत्याखाली तारापूर एमआयडीसीतील टिमा कार्यालयात महिन्याभरापासून कार्यालय सुरू करण्यात आले असून बोईसर विधानसभा मतदार संघातील यंत्रणेची विविध कामे, प्रशिक्षण, नियोजन, आखणी आणि अंमलबजावणी येथूनच सुरू आहे.

या निवडणूक प्रक्रियेसाठी दोन दिवस एसटीच्या ३२ आणि २ खाजगी अशा एकूण ३४ बसेसचा वापर होणार असून यापैकी २५ बसेस बोईसर डेपोच्या तर ७ बसेस नालासोपारा डेपोतून मागवण्यात आल्या आहेत. या बरोबरच १४ मिनी बस, २० जीप, ४६ झोनलसाठी जीप, ४ ट्रक, तर २ बोटींचा वापर करण्यात येणार आहे. या पैकी ४ जीप, मॅजिक आणि १ बोट राखीव ठेवण्यात येणार आहे. या मधील ४८ झोनच्या वाहनांना जीपीएस यंत्रणाही बसविण्यात आल्या आहेत. निवडणूक साहित्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना नियोजित मतदानाच्या स्थळी पोहोचवण्यासाठी तसेच सोमवारी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर मतदान यंत्र बोईसर निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात आणण्यासाठी या सर्व यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.

काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीतही एसटीच्या बसेसचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी निवडणुकीच्या माध्यमातून एसटीला लाखो रु पयांचा महसूल मिळाला होता. सोमवारी होणाºया मतदानासाठी देखील सलग दोन दिवस बारा-बारा तासांसाठी बोईसर एसटी डेपोतून निवडणूक प्रक्रियेसाठी बसेस देण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक फेºयांवर परिणाम होऊन एसटीच्या नेहमीच्या फेºया कमी होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :boisar-acबोईसरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान