शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

अतिरिक्त बांधकाम ताेडण्यासाठी ३० दिवसांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 12:01 AM

रिलायन्स माॅल इमारतमालकाला डहाणू नगर परिषदेची नाेटीस : तत्काळ वापर थांबविण्याचे आदेश

 

लोकमत न्यूज नेटवर्क डहाणू :  डहाणू शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रिलायन्स मॉल इमारतीत अतिरिक्त वाढीव बांधकाम केल्याचे निष्पन्न झाल्याने नगर परिषदेने नोटीस बजावली आहे. या मॉलचे अतिरिक्त बांधकाम ३० दिवसांत तोडण्याचे व बेकायदा वापर बंद करण्याचे आदेश मॉलच्या इमारतमालकाला दिले आहेत.  यामुळे शहरातील बेकायदा बांधकामे करणाऱ्यांना धडकी भरली आहे. गेल्या वर्षी रिलायन्स मॉल सुरू झाला. तालुक्यातील हा पहिलाच वातानुकूलित मॉल आहे. दररोज हजारो ग्राहक येथे विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. मात्र, या मॉलचे बांधकाम बेकायदा आढळले आहे. मॉलची अतिरिक्त उंची साडेचार मीटर आढळून आल्याने हे बांधकाम ३० दिवसांत तोडण्याचे आदेश डहाणूचे मुख्याधिकारी तथा प्रयोजन अधिकारी यांनी दिले आहेत. डहाणू नगर परिषदेकडून या मॉलचे बांधकाम करताना सुधारित परवानगी ६३११चे उल्लंघन केले आहे. नगर परिषदेने पूर्वी दिलेली नोटीस रद्द केली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम व १९६५ अन्वये मुख्याधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारांनुसार बेकायदा बांधकामांवर ही कारवाई करण्यात आली. याबाबत कसूर झाल्यास खटला दाखल करण्याचे आदेश नोटिशीद्वारे देण्यात आले आहेत. दरम्यान, डहाणू नगर परिषद हद्दीत अनेक बेकायदा बांधकामे झाली आहेत. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन होत आहे. साहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी एका अहवालात १५ पैकी १२ इमारती बेकायदा असल्याचा ठपका ठेवला आहे.

आम्ही नगर परिषदेकडून कायदेशीर परवानगी घेतलेली आहे. त्यानुसारच बांधकाम केलेले असून, यासंबंधीची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. - मिहीर शहा, मालक, रिलायन्स मॉल 

हे बेकायदा बांधकाम मिहीर शहा यांच्या नगराध्यक्ष कार्यकाळातील आहे. त्यांच्या २०१४ ते २०१७ या कालावधीतील विकासकामांची चौकशी करावी. गोपीपुरा जैन मंदिर येथे रेल्वे लाइनलगत असलेल्या अनियमित बांधकामाची चौकशी व्हावी. - भरत राजपूत, नगराध्यक्ष, डहाणू