हृदयद्रावक! विरारमध्ये भिंत कोसळून ३ महिला कामगारांचा मृत्यू; २ सख्या बहिणींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 19:47 IST2023-06-06T19:46:36+5:302023-06-06T19:47:20+5:30

विरारच्या मनवेल पाडा येथे बांधकाम सुरू असताना ही घटना घडली.

3 women workers unfortunately died in an accident when a wall collapsed during construction at Manvel Pada in virar  | हृदयद्रावक! विरारमध्ये भिंत कोसळून ३ महिला कामगारांचा मृत्यू; २ सख्या बहिणींचा समावेश

हृदयद्रावक! विरारमध्ये भिंत कोसळून ३ महिला कामगारांचा मृत्यू; २ सख्या बहिणींचा समावेश

(मंगेश कराळे)
 
नालासोपारा : विरारच्या मनवेल पाडा येथे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३ महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. विरारच्या येथे सूर्य किरण या इमारतीच्या पुर्निविकासाचे काम सुरू होते. या ठिकाणी १२ मजूर काम करत होते. संध्याकाळी काम संपवून मजूर जवळील साचलेल्या पाण्यात हातपाय धुण्यासाठी गेलो होते. पाचच्या सुमारास अचानक तेथील भिंत या मजुरांच्या अंगावर कोसळली आणि ते ढिगार्‍याखाली गाडले गेले. अग्निशमन दलाच्या मदतीने ढिगारा काढण्यात आला. त्यात कौसाबाई गव्हाणे (४५), राधाबाई नवघरे (४०) आणि नंदाबाई गव्हाणे (३२) या तिन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला होता.

तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी विरारच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याचे कळते. मयत कामगार हे नाका कामगार असून मराठवाड्यातील आहे. विरार पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मार्च महिन्यात माणिकपूर येथे इमारतीचे बांधकाम सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरील सज्जा कोसळला होता. हा सज्जा थेट खाली रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या रिक्षावर पडला. यात रिक्षात बसलेली रेणू गुप्ता (३५) या महिलेचा मृत्यू झाला होता.

Read in English

Web Title: 3 women workers unfortunately died in an accident when a wall collapsed during construction at Manvel Pada in virar