महावितरणच्या 3 लाख ग्राहकांना मुसळधार पावसाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 13:55 IST2018-07-10T13:54:33+5:302018-07-10T13:55:17+5:30
सोमवारपासून (9 जुलै) मुंबई व उपनगरीय परिसरात सुरू असलेला सतंतधार पावसामुळे, वसई-विरार भागाला वीजपुरवठा करणाऱ्या 'महापारेषण वसई अति उच्च दाब केंद्रा'च्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरले आहे.

महावितरणच्या 3 लाख ग्राहकांना मुसळधार पावसाचा फटका
वसई-विरार : सोमवारपासून (9 जुलै) मुंबई व उपनगरीय परिसरात सुरू असलेला संततधार पावसामुळे, वसई-विरार भागाला वीजपुरवठा करणाऱ्या 'महापारेषण वसई अति उच्च दाब केंद्रा'च्या नियंत्रण कक्षामध्ये पाणी शिरले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय योजना म्हणून तसेच उपकरणाच्या सुरक्षेच्या हेतूने सदर उच्च दाब वीज केंद्राचा वीज पुरवठा सकाळी 7.30 वाजल्यापासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वसई गाव ,वसई (पश्चिम परिसर), नालासोपारा, आचोळे ,विरार (पश्चिम), जुचंद्र, नवघर, वालिव आगाशे, मनवेलपाडा, अनाळा , या भागातील विजपुरवठा खंडित आहे. यामुळे महावितरणचे सुमारे 3 लाख ग्राहक प्रभावित झाले आहेत.
(Mumbai Rains : मानुखर्द स्थानकात रुळांवर साचलं पाणी, वाशी-सीएसएमटी हार्बर रेल्वे ठप्प)
यातील काही भागाचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव खंडित करण्यात आला आहे. महावितरण वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वसई-विरारच्या परिसिथतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येताच सुरक्षेचा आढावा घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येईल.
महावितरणचे ग्राहक गरजेनुसार 1912, 18001023435 व 18002333435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात,अशी माहितीही नागरिकांना देण्यात आली आहे.