नालासोपारा-विरारमध्ये १४ नवे कोरोना रुग्ण; बाधितांमध्ये १० महिन्यांचा मुलगाही समाविष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 02:19 AM2020-05-03T02:19:30+5:302020-05-03T02:19:43+5:30

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध ठिकाणच्या १९ कोरोनाबाधित रुग्णांवर बोईसर येथील टिमा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

14 new corona patients in Nalasopara-Virar; The victims include a 10-month-old boy | नालासोपारा-विरारमध्ये १४ नवे कोरोना रुग्ण; बाधितांमध्ये १० महिन्यांचा मुलगाही समाविष्ट

नालासोपारा-विरारमध्ये १४ नवे कोरोना रुग्ण; बाधितांमध्ये १० महिन्यांचा मुलगाही समाविष्ट

Next

वसई : वसई-विरार महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात नालासोपारा आणि विरारमध्ये १४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये विरारमधील अवघ्या १० महिन्यांचा मुलगा व नालासोपाऱ्यातून ८ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. दरम्यान, वसई-विरारमधून तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता वसई- विरार मनपा हद्दीतील कोरोनाबाधितांची संख्या १४८ झाली आहे.

वसई-विरारमधील शनिवारी आढळून आलेल्या १४ बाधित रुग्णांमध्ये विरार व नालासोपारामधील ९ पुरुष आणि ८ वर्षांच्या मुलीसह सहा महिलांचा समावेश आहे. यातील बहुतांश रुग्ण हे हायरिस्क संपर्कातले आहेत. तर विरार पूर्वेतील एक कुटुंबातील ८२ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय व ४८ वर्षीय महिला बाधित असून यांच्यासह सर्व रुग्णांवर नालासोपारा, वसई आणि मुंबईतील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. दरम्यान, वसई-विरार महापालिकेच्या विविध भागात व मुंबईत उपचारासाठी दाखल असलेल्या तीन रुग्णांना शनिवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यात वसई पश्चिमेतील १ आणि विरार पूर्वेतील दोन रुग्णांचा समावेश आहे.

बोईसरमध्ये नऊ रुग्णांना डिस्चार्ज
बोईसर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध ठिकाणच्या १९ कोरोनाबाधित रुग्णांवर बोईसर येथील टिमा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी नऊ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. या ९ कोरोनाबाधित रुग्णांच्या १२ व १४ व्या दिवशी घेण्यात आलेल्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या असून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पालघर तालुक्यातील काटाळे व सफाळे गावातील प्रत्येकी तीन तर डहाणू तालुक्यातील दोन डॉक्टर व नऊ रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: 14 new corona patients in Nalasopara-Virar; The victims include a 10-month-old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.