क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या मुलांच्या गाडीला अपघात, १३ विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 00:47 IST2019-11-29T00:46:39+5:302019-11-29T00:47:15+5:30
बीटप्रमाणे होणा-या क्रीडा स्पर्धेसाठी ओंदे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यशवंतनगर येथे जात असताना वाहन एका बाजूने उलटल्याने गाडीतील १८ पैकी १३ विद्यार्थी जखमी झाले आहेत.

क्रीडा स्पर्धेसाठी जाणाऱ्या मुलांच्या गाडीला अपघात, १३ विद्यार्थी जखमी
विक्रमगड - बीटप्रमाणे होणा-या क्रीडा स्पर्धेसाठी ओंदे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यशवंतनगर येथे जात असताना वाहन एका बाजूने उलटल्याने गाडीतील १८ पैकी १३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ओंदे शाळेचे मुख्याध्यापक स्वत: गाडी चालवत होते.
१८ विद्यार्थी, एक शिक्षिका यांच्यासह मुख्याध्यापक सकाळी १० वाजता स्पर्धेसाठी यशवंतनगर येथे जात होते. मात्र, ओंदे पुलावरील वळणावर ही गाडी उलटल्याने मुलांना दुखापत झाली तर मुख्याध्यापक बचावले.
या जखमी मुलांना विक्रमगड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील ५ विद्यार्थ्यांचे हात फ्रॅक्चर झाल्याने तसेच डोक्याला मार लागला आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले.