घराचं छत कोसळून १ जण ठार तर ४ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 18:56 IST2019-04-05T18:55:40+5:302019-04-05T18:56:55+5:30
खान कुटुंबियांवर कुटुंबातील एकजण दगावल्याने शोककळा पसरली आहे.

घराचं छत कोसळून १ जण ठार तर ४ जण जखमी
मीरारोड - भाईंदर पूर्व परिसरातील एका इमारतीतील फ्लॅटचे छत कोसळून एकाच कुटुंबातील १ जण ठार आणि ४ जण जखमी झाले आहेत. भाईंदर पूर्व परिसरातील एम.आय. औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या साई पुष्पक इमारतीतील फ्लॅट क्र.३०१ चे छत कोसळले. या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या खान कुटुंबियांवर कुटुंबातील एकजण दगावल्याने शोककळा पसरली आहे.
या कुटुंबातील मुकीन खान (४०) यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. मोहम्मद हारुल खान (३०), मोहम्मद खलिफा खान (४५), मोहम्मद नासिस खान (३९) आणि आशिया बेगम (२८) हे ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुर्घटना घडलेली इमारत 25 वर्षे जुनी आहे. 2 महिन्यांपूर्वी सोसायटीने सर्व सभासदांना दुरुस्तीसाठी नोटीस बजावली होती.