Corona Virus in Wardha; वर्धा जिल्ह्यात मुंबईहून आलेली तरूणी निघाली कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:54 PM2020-05-22T12:54:12+5:302020-05-22T13:04:45+5:30

राज्याच्या इतर भागातून आलेल्या व्यक्तींमुळे वर्धा जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत सतत भर पडत आहे. मुंबईहून आष्टी तालुक्यात आलेली एक युवती करोनाबाधित असल्याचा अहवाल हाती आला आहे.

A young woman from Mumbai in Wardha district tested positive for corona | Corona Virus in Wardha; वर्धा जिल्ह्यात मुंबईहून आलेली तरूणी निघाली कोरोना पॉझिटिव्ह

Corona Virus in Wardha; वर्धा जिल्ह्यात मुंबईहून आलेली तरूणी निघाली कोरोना पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देआष्टी तालुक्यात चिंतेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: राज्याच्या इतर भागातून आलेल्या व्यक्तींमुळे वर्धा जिल्ह्याच्या रुग्ण संख्येत सतत भर पडत आहे. मुंबईहून आष्टी तालुक्यात आलेली एक युवती करोनाबाधित असल्याचा अहवाल हाती आला आहे.
करोनाबाधित तरुणीचा भाऊ मुंबईहून तिला कारने ८ दिवसांपूर्वी घेऊन आला. त्यानंतर ५ व्यक्तींचे संपूर्ण कुटुंब गृह विलगीकरणात होते. दोन दिवसांपूर्वी तरूणीमध्ये करोनाची लक्षणे आढळल्याने तिला सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. तिचा करोना चाचणी अहवाल शनिवारी सकाळी प्राप्त झाला. त्यात ती करोना विषाणूने बाधित असल्याचे निष्पन्न झाले. या तरूणीवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कुटुंबातील इतर चौघांना सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे.
यापूर्वी वर्ध्यात आलेले वाशीम, अमरावती, नवी मुंबई, गोरखपूर येथील नऊ रूग्ण उपचार घेत आहेत. आवीर्तील महिलेचा मृत्य झाला असून सेवाग्राम व सावंगीच्या रुग्णालयात दहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आर्वीत एकमेव कन्टेन्मेंट झोन असून त्यात ११ हजार ३९५ व्यक्तींचे सर्वेक्षण झाले आहे. एकूण १०,०११ व्यक्ती गृह विलगिकरणात तर १२६ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणातील आहेत

 

Web Title: A young woman from Mumbai in Wardha district tested positive for corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.