शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

यंदा १.८२ लाख हेक्टरात कापूस

By admin | Updated: May 19, 2014 23:51 IST

खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांच्या मागणीनुसार बियाणे, खते, औषधी तसेच वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी बियाणे उत्पादन करणार्‍या संस्था,

पालकमंत्र्यांकडून खरीपाचा आढावा : शेतकर्‍यांना सहकार्य करण्याचे आवाहन

वर्धा : खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांच्या मागणीनुसार बियाणे, खते, औषधी तसेच वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी बियाणे उत्पादन करणार्‍या संस्था, खत पुरवठादार तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधी शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी केले. वर्धा जिल्ह्यात आगामी खरीप हंगामासाठी ४ लक्ष २० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणीचे नियेजन करण्यात आले असून, यामध्ये सर्वाधिक १ लक्ष ८२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात कापूस, १ लक्ष ६९ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन तर ६२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रात तूर आदी पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. अतिवृष्टी व गारपीटीमुळे सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात उत्पादकता कमी झाल्यामुळे बियाणांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकर्‍यांनी कापूस आदी पिकांना प्राधान्य द्यावे असेही पालकमंत्री मुळक यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगामात विविध पिकांचे नियोजन तसेच बियाणांची व खतांची उपलब्धता शेतकर्‍यांना खरीप कर्जाचे वाटप आदींचे नियोजन पालकमंत्री मुळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आलीे.खरीप हंगामामध्ये शेतकर्‍यांना उत्तम प्रतीचे बियाणे, रासायनिक खते आदी शेतकर्‍यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर नियोजन करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्यात. जिल्ह्यात उत्पादन वाढीसाठी विशेष कार्यक्रम तयार करून शेतकर्‍यांना त्यांच्या शेतापर्यंत या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी विशेष मोहिम राबवावी. सोयाबीन या पिकाकडे शेतकर्‍यांच्या विशेष कल वाढत असल्यामुळे त्याच्या मागणीनुसार बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकर्‍यांकडे असलेल्या बियाणांवर प्रक्रिया करून पेरणी करण्यासंदर्भात विशेष जनजागृती मोहिम राबविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. प्रारंभी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी स्वागत करून खरीप हंगामात विविध पिकांच्या नियोजनाबाबत माहिती दिली. बीबीएफ पद्धतीद्वारे पेरणी संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातर्फे शेतकर्‍यांच्या मार्गदर्शनासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष मार्गदर्शन भिंतीपत्रकाचे तसेच शेतकर्‍यांसाठी असलेल्यसा सुविधे संदर्भातील टोल फ्री क्रमांकाच्या पोस्टरचे विमोचन यावेळी पालकमंत्री मुळक व राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्याहस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम तसेच पर्यटन राज्यमंत्री रणजित कांबळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, आमदार अशोक शिंदे, दादाराव केचे, मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी, खतपुरवठा कंपन्यांचे प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)