शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

जागतिक पर्यटनाचे केंद्र बोर व्याघ्र प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 5:00 AM

या अभयारण्यात राष्ट्रीय पक्षी मोर विपूल प्रमाणात पहावयास मिळतात. राज्यपक्षी हरियाल, वर्धा शहरपक्षी निलपंखापासून तर सर्पगरुड, तुर्रेवाला गरुड, बहिरी ससाणा, कापशी घार, स्वर्गीय नर्तक, धनेश, तांबट, हळद्या तसेच विविध प्रकारच्या घुबडांसह सुमारे १८५ प्रकारच्या पक्ष्यांचा येथे अधिवास आहे. याच प्रकल्पातून बोर ही उपनदी वाहते. या नदीवर तसेच बोर धरणाच्या बॅक वॉटरवर विविध पाणपक्षी दिसतात शिवाय जलजीवाचेही येथे वास्तव आहे.

ठळक मुद्देमानवापासूनच वन्यजीवांना धोका

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्यलढ्यात केंद्रबिंदू राहिलेल्या सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमानंतर बोर व्याघ्र प्रकल्प जागतिक पर्यटनाचे दुसरे केंद्र ठरले आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या आणि वर्धा व नागपूर जिल्ह्यात सामावलेल्या या बोर व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेची संमृद्धता पर्यटकांना आपल्याकडे खुणावतेय.वनपर्यटनाबाबत लोकांमध्ये मोठ्याप्रमाणात आकर्षण निर्माण झाल्याने दरवर्षी हजारो पर्यटक या व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात.सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प हा भारतातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प असून जुने आणि नवीन बोर मिळून १३८ चौरस किलोमीटर क्षेत्रात या प्रकल्पाचा विस्तार झाला आहे. बोर नदी आणि बोरधरणामुळे हा प्रकल्प जैवविविधेतेने नटला आहे. या अभयारण्यात सागवान, तेंदू, बांबू, आजन, मोह, करु यासारख्या संमिश्र वृक्षांसोबतच कॅशिया, टोरा, ट्रिब्युलस टेरीटेरीज, वाघेरी, वेलची, कळटा, रानतुळस, वनभेंडी अशा विविध प्रकारच्या उपयुक्त वनस्पती आहेत. प्रत्येक ऋतूत वेगळा दिसणाऱ्या करु वृक्षाचा डिंक हा कॅप्सूलचे आवरण बनविण्यासाठी वापरला जात असल्याने तो अत्यंत मूल्यवानही आहे. या प्रकल्पात वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, रानडुक्कर, कोल्हे, लांडगे, रानमांजरी, क्वचितच आढळणारा तडस, खवले मांजर, साळींदर, मसण्याऊद वन्यजीवांसोबतच ठिपकेदार चितळ, भेकर, सांबर, नीलगायी, अशा तृणभक्षी प्राण्यांचाही येथे वावर दिसून येतो.या अभयारण्यात राष्ट्रीय पक्षी मोर विपूल प्रमाणात पहावयास मिळतात. राज्यपक्षी हरियाल, वर्धा शहरपक्षी निलपंखापासून तर सर्पगरुड, तुर्रेवाला गरुड, बहिरी ससाणा, कापशी घार, स्वर्गीय नर्तक, धनेश, तांबट, हळद्या तसेच विविध प्रकारच्या घुबडांसह सुमारे १८५ प्रकारच्या पक्ष्यांचा येथे अधिवास आहे. याच प्रकल्पातून बोर ही उपनदी वाहते. या नदीवर तसेच बोर धरणाच्या बॅक वॉटरवर विविध पाणपक्षी दिसतात शिवाय जलजीवाचेही येथे वास्तव आहे. येथे फुलपाखरांच्याही विविध प्रजाती असून त्या पर्यटकांसह अभ्यासकांनाही भुरळ घालतात. या जैवविविधतेमुळेच बोर अभयारण्य विदर्भाचे नंदनवन म्हणूनही ओळखले जाते.मानवापासूनच वन्यजीवांना धोकावन्यजीवांची शिकार आणि अवैध वृक्षतोड हा मोठा धोका मानवप्राण्यांपासून संभवतो. त्यासोबतच नियामांचे उल्लंघन करीत होणारी जनावरांची चराई जंगलापुढे नवे आव्हान उभे करतात. पाळीव जनावरांच्या चराईमुळे केवळ विविध प्रकारच्या गवताचे आणि वनस्पतीचे नुकसान होत नाही तर जंगलावर होणारे हे अतिक्रमण शिकारी आणि चोरांना नव्या वाटा निर्माण करुन देतात. जेव्हा पर्यावरणप्रेमी ‘वाघ वाचवा’ असे म्हणतात तेव्हा त्या मागे केवळ वाघ वाचविणे इतकाच मर्यादित अर्थ नसतो. वाघांसाठी जंगल सुरक्षित करणे म्हणजे प्राणवायू देणारी झाडे वाचविणे, पावसाचे ढग अडविणारे डोंगर वाचविणे, जंगलातील दुर्मिक जीवसृष्टी वाचविणे, जंगलातून वाहणाºया आणि शहरांना पाणी पुरविणाºया नद्या वाचविणे पर्यायाने माणूस वाचविणे, असा व्यापक अर्थ होतो. त्यामुळे प्रत्येकाने ही जैवविविधता वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.आज मोठ्या प्रमाणात पर्यावरणप्रेमी संस्था वृक्षारोपणाचे काम करीत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. आपल्या सभोवतीचा परिसर हिरवा करण्यासाठी झाडे लावता येतील, टेकड्याही हिरव्या करता येतील पण, निसर्गत: निर्माण होणारे जंगल कसे निर्माण करता येईल? जंगल निर्माण करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे आपली जंगले सुरक्षित ठेवणे. आपल्या शहराचे केपटाऊन होऊ नये यासाठी काळजी घ्यावी लागेल. विकासाच्या नावावर नैसर्गिक संपदांना ओरबडणे सुरु आहे. हे असेच सुरु राहिले तर निसर्ग आम्हाला कधीही क्षमा करणार नाही. आमच्या आजच्या चुकांची शिक्षा उद्याच्या पिढ्यांना भोगावी लागेल.संजय इंगळे तिगावकर, मानद वन्यजीव रक्षक, वर्धासेलू तालुक्यातील बोर अभयारण्य हा वर्धा जिल्ह्याला लाभलेला महत्त्वाचा जैविक ठेवा आहे. ज्याच्या शिवाय जंगल पूर्ण होत नाही अशा वाघाचे वास्तव्य आहे. एका अर्थाने परिपूर्ण असे हे जंगल आहे. विविध तृणभक्षी प्राणी, राष्ट्रीय पक्षी मोर हे बोरचे वैभव आहे. पक्षी, पक्ष्यांचे भक्ष असलेले कीटक व ज्या वनस्पतीच्या आधारे हे कीटक जगतात त्या वनस्पती, असा त्रीस्तरीय अभ्यास करण्याची योजना बहार नेचर फाउंडेशनने आखली आहे. बोर प्रशासनाने त्यास मंजूरी दिल्यास बोर अभयारण्याची रितसर जैवविविधता नोंदवही तयार होण्यास मदत होईल.किशोर वानखडेअध्यक्ष, बहार नेचर फाऊंडेशन

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्पtourismपर्यटन