शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मालखान्यातून दारू चोरणारे दारूविक्रेत्यांकडे कामावर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील अवैध दारूविक्रेत्यांच्या अडचणी वाढल्या आहे. दारूविक्रेत्यांकडे नागरिकांना देण्यासाठी दारूच नसल्याने दारूविक्रेते नवनवीन शक्कल लढवत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. आरती चौक परिसरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मालखाना आहे. या मालखान्यात जप्तीतील दारू साठवणूक करून ठेवली जाते.

ठळक मुद्देआणखी चार महिलांना अटक : आरोपींची संख्या झाली आठ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील आरती चौक परिसरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मालखान्यातून दारू चोरी करताना चौघांना अटक केली होती. त्या प्रकरणात शहर पोलिसांनी पुन्हा चार महिलांना अटक केली असून आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे चोरी प्रकरणातील आरोपी हे रामनगर परिसरातील दारूविक्रेत्यांकडे कामावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांनी तर त्यांना मालखान्यातून दारूची चोरी करावयास सांगितले नसेल ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील अवैध दारूविक्रेत्यांच्या अडचणी वाढल्या आहे. दारूविक्रेत्यांकडे नागरिकांना देण्यासाठी दारूच नसल्याने दारूविक्रेते नवनवीन शक्कल लढवत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. आरती चौक परिसरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मालखाना आहे. या मालखान्यात जप्तीतील दारू साठवणूक करून ठेवली जाते. ११ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मालखान्यातील दारू चोरली होती. याप्रकरणी पोलिसांनी नीलेश फुलहार, मनोज उईके, सुनील वनकर, रविकांत ठाकूर यांना अटक केली होती. याचा तपास सुरू असतानाच शहर पोलिसांना आर्वीनाका परिसरातील झोपडपट्टीतील काही महिलांचा या चोरी प्रकरणात सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोनू मुळे, पूजा मुळे, अनिता जाधव, शांता सातपुते यांना अटक केली. शहरात सुमारे दोनशेच्यावर दारूविक्रेते दारूविक्रीचा व्यवसाय करीत असून लॉकडाऊनमुळे दारूची चोरटी वाहतूकही बंद झाली आहे. आता मद्यपींना देण्यासाठी दारूविक्रेत्यांकडे दारूच उपलब्ध नसल्याने त्यांनी थेट मालखान्यात ठेवलेली जप्तीतील दारू चोरी करण्याची शक्कल लढविली तर नसेल ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी यादृष्टीनेही तपासचक्र फिरविण्याची गरज आहे.दारू चोरी प्रकरणामागे मोठी साखळी असून चोरट्यांनी चोरलेली दारू कोणाला पुरविली, या चोरीमागे कोणाचे कनेक्शन आहे. याचा सखोल तपास सुरु आहे. चोरीतील कनेक्शन असलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल.योगेश पारधी, पोलीस निरीक्षक, वर्धा शहर

टॅग्स :Socialसामाजिक