शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याकरीता महिलांची ग्रामपंचायतीवर धडक

By admin | Updated: May 24, 2014 00:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ पिपरी (मेघे) येथील बेघर वस्तीतील नागरिकांवर आली आहे. गत पाच दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या नळांना पाण्याचा एकही थेंब आला

वर्धा : उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ पिपरी (मेघे) येथील बेघर वस्तीतील नागरिकांवर आली आहे. गत पाच दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या नळांना पाण्याचा एकही थेंब आला नसल्याने शुक्रवारी दुपारी संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान ग्रामपंचायतीने धरणाच्या गेटची दुरूस्ती करण्यात येत असल्याने पाणी पुरवठा सुरळीत करणे शक्य होत नसल्याचे सांगण्यात आले. हे गेट दुरूस्त होताच नागरिकांना पाणी देण्यात येईल असे आश्वासन ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आले आहे. पिपरी (मेघे) गावातीन नागरिकांना पाणी पुरविण्याकरिता ग्रामपंचायतीची नळ योजना आहे. या नळयोजनेला येळाकेळी येथील धरणावरून व धरणाशेजारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या येथे असलेल्या छोट्या धरणाच्या गेटमध्ये व नागरिकांना पाणी पुरवठा करण्याकरिता असलेल्या पाईपलाईनमध्ये बिघाड आल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. सध्या विहिरीत जेवढे पाणी आहे तेवढ्या पाण्याच्या आधारावर पिपरी गावात पाणी पुरवठा करण्यात येत आहे; मात्र येथील अतिक्रमित असलेल्या या वस्तीत गत पाच दिवसांपासून पाणीच आले नसल्याने त्यांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. कधी परिसरातील कुण्या विहिरीवरून तर कधी हातपंपावरून भर उन्हात पाणी आणून नागरिकांना त्यांची गरज भागवावी लागत आहे. यामुळे गावात ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराबाबत रोष व्यक्त करण्यात आला. हाच रोष रस्त्यावर आणत संतप्त झालेल्या या वस्तीतील महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी महिलांनी आम्हाला पहिले पाणी द्या नंतर काय ते करा अशी भूमिका घेली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान धरणाची दुरूस्ती व पाईपलाईन मध्ये आलेल्या बिघाडामुळे पाणी पुरवठा करण्यास अडचण येत असल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. धरणाची दुरूस्ती होताच पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांना सांगण्यात आल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला. (प्रतिनिधी)