विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:12 IST2018-03-14T00:12:41+5:302018-03-14T00:12:41+5:30
घराच्या छतावरील टिनावर कपडे वाळत टाकण्याकरिता गेलेल्या महिलेचा विजेचा जबर धक्का बसल्याने मृत्यू झाजा.

विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत
घोराड : घराच्या छतावरील टिनावर कपडे वाळत टाकण्याकरिता गेलेल्या महिलेचा विजेचा जबर धक्का बसल्याने मृत्यू झाजा. वैशाली उर्फ शानु धुलेंद्र करकाडे (२२) असे मृतक महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली.
प्राप्त माहितीनुसार, वैशाली ही धुतलेले कपडे वाळविण्यासाठी घराच्या छतावर गेले. येथे टिनावर कपडे टाकताच तिला विजेचा जबर धक्का बसला. यात ती खाली कोसळली. हे शेजारच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासाअंती तिचा मृत्यू झाला होता. शानु उर्फ वैशाली व धुलेंद्र हे बालाघाट जिल्ह्यातील खारा तहसील किरणापूर येथील रहिवासी असून मजुरीच्या शोधात ते सेलू येथे स्थायी झाले. त्यांचे दोन वर्षापूर्वी लग्न झाले असून त्यांना सात महिन्याचा मुलगा आहे. त्यांच्या परिवारात आई, वडील, भाऊ, बहीण असे सहा व्यक्ती आहेत. या घटनेची सेलू पोलिसात नोंद असून मृतक महिलेचे सेलू ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास सहायक फौजदार मनोहर बोरघरे, जमादार नाना खैरकार, जितू डांगे, राजू पाथरे, अर्चना तुमडाम करीत आहे.