शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

वायफडच्या दारुबंदीसाठी महिलेने चौकातच विकली दारु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:01 IST

जिल्ह्यात दारुबंदी केवळ कागदोपत्रीच राहिली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दारुचे पाट वाहत असून पोलिसांकडूनही कारवाईसाठी चालढकल केली जाते. वायफड येथेही काही दिवसांपासून अशीच परिस्थिती असल्याने घरातील कर्ता पुरुष आणि मुलगाही दारुच्या व्यसनी लागले आहे. परिणामी घरातील महिलांना कुटुंबाचा सांभाळ करताना अडचणी निर्माण होत आहे.

ठळक मुद्देप्रतिकात्मक आंदोलन : पुलगावच्या पोलीस निरीक्षकांनी धाव घेत दिले कारवाईचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील वायफड या गावात मोठ्या प्रमाणात दारुविक्री होत असल्याने अनेकांच्या संसारामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करुनही गावातील दारुबंदी होत नसल्याने त्रस्त झालेल्या एका महिलेने गावातील भरचौकात प्रतिकात्मक दारुविक्री आंदोलन करुन जशास तसे उत्तर दिले. त्यामुळे पोलिसांनीही गावाकडे धाव घेऊन गावातील दारुबंदी करण्याचे आश्वासन दिले.जिल्ह्यात दारुबंदी केवळ कागदोपत्रीच राहिली आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दारुचे पाट वाहत असून पोलिसांकडूनही कारवाईसाठी चालढकल केली जाते. वायफड येथेही काही दिवसांपासून अशीच परिस्थिती असल्याने घरातील कर्ता पुरुष आणि मुलगाही दारुच्या व्यसनी लागले आहे. परिणामी घरातील महिलांना कुटुंबाचा सांभाळ करताना अडचणी निर्माण होत आहे. दिवसभर मोलमजुरी करुन थकल्यावर घरी आल्यानंतर पती व मुलांकडूनही त्रास दिल्या जात असल्याने आशाबाई आनंदराव उघडे यांनी गावातील दारुविक्रेत्यांना दारुविक्री बंद करण्याची विनंती केली.तरीही दारुविक्री बंद न झाल्याने आशाबाईनी जशास तसे उत्तर देण्यासाठी गावातील चौकातच प्रतिकात्मक दारुविक्री आंदोलन करुन ‘आधी गावातील दारुबंदी करा अन्यथा मी येथेच दारुविक्री करणार’ असा इशारा दिला.याची माहिती पुलगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी लागलीच गावाकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांनी आशाबाईची समजूत काढून गावातील सामाजिक भवनामध्ये गावकऱ्यांची बैठक घेतली.गावात कोण दारुविक्री करतो त्याची माहिती द्या, आम्ही तात्काळ दारुविक्री बंद करुन, असे आश्वासन दिले. त्यानंतर आशाबाईने आपले आंदोलन मागे घेतले असून पोलिसांनीही तिला सोडून दिले. या अनोख्या धाडसी आंदोलनाने दारुविक्रे त्यांसह गावातील मद्यपीही हादरुन गेले आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदी