शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

वीज महामंडळाला वाऱ्याची ‘अ‍ॅलर्जी’

By admin | Updated: May 6, 2016 01:52 IST

हलका वारा सुटला वा साधारण पाऊस आला तरी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे....

तब्बल २२ तास गावातील वीजसेवा खंडीत
तळेगाव (टालाटुले): हलका वारा सुटला वा साधारण पाऊस आला तरी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहे. बुधवारी वादळामुळे गावातील विद्युत खंडीत झाली ती २२ तासानंतरही सुरळीत झाली नाही. यामुळे येथील विद्युत महामंडळाला वाऱ्याची अ‍ॅलर्जी तर झाली नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अन्न, वस्त्र व निवारा या गरजासोबत आता विजही आवश्यक बाब झाली आहे. ग्रामीण भागही आता प्रकाशाशिवाय राहू शकत नाही. येथील विद्युत मंडळात १० ते ११ गावे येत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे तळेगावात पाच लाईनमनची आवश्यकता आहे. असे असताना येथे एका लाईनमनवरच काम सुरू आहे. या भागात केवळ पाच लाईनमन कार्यरत आहेत. त्यामुळे येथील विद्युत मंडळाची मदार खासगी कामगारावर आहे. या गावात लाईनमन एकच असल्याने वेळेवर तक्रारीचे निवारण होत नसल्याने येथील शेतकरी व घरगुती ग्राहक खासगी माणसाला पैसे देवून कामे करीत असल्याचे वास्तव आहे. याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.


चोरीमुळे गावात दहशत
गावात दोन दिवसांपूर्वी रात्री अमोल भेंडे यांच्या गावालगत असलेल्या शेतातील घरात दोन लाखांची घरफोडी झाल्याने गावकरी अधिकच धास्तावले. त्यातच काल गावात काळोख पसरल्याने आणखीच गावकरी भीती निर्माण झाली होती. पावसाळयाचे दिवस जवळ येत आहे. या दिवसात जर स्थिती अशीच राहिली तर गावकऱ्यांना रोजच अंधारात राहण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.