शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळी साजरी करण्यासाठी पैसा आणायचा कोठून ?

By admin | Updated: October 18, 2014 23:41 IST

जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली. नवे सभापती निवडले गेले. विषय समित्यांचे वाटप बुधवारी करण्यात आले. यामध्ये शिक्षण समिती मिलिंद भेंडे यांना वाट्याला आले. ही सभा होताच त्यांनी

नव्या शिक्षण सभापतीच्या फतव्याने शिक्षक चिंतेत : गुंडाळलेल्या उपक्रमाची नव्याने सक्तीवर्धा : जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली. नवे सभापती निवडले गेले. विषय समित्यांचे वाटप बुधवारी करण्यात आले. यामध्ये शिक्षण समिती मिलिंद भेंडे यांना वाट्याला आले. ही सभा होताच त्यांनी शाळांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा फतवा काढला. दिवाळी ही आनंद देणारा, घरात सुख शांती आणणारा, जीवन प्रकाशमान करणारा सण आहे. राष्ट्रीय सण म्हणूही साजरा केला जातो. एकाएकी धडकलेल्या या निर्णयामुळे निधी कोठून आणायचा, लोकसहभाग किती लाभेल, असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समित्यांंना पडला आहे. भेंडे हे यापूर्वी कॉँग्रेसमध्ये होते. तेव्हा जिल्हा परिषदेवर कॉँग्रेसची सत्ता असताना त्यांना सभापती पदाचा मान मिळाला होता. तेव्हाही त्यांच्याकडे जि.प.चे शिक्षण सभापतीपद होते. त्याहीवेळी त्यांनी शाळांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम पुढे आणला होता. त्यावेळीही हा उपक्रम वादग्रस्त ठरला होता. परिणामी त्यांच्यानंतरच्या सभापतींनी हा उपक्रम कायमचा बासणात काढला होता. आता ते भाजपात असताना सभापती झाले आणि पुन्हा तोच निर्णय शाळांवर लादल्याचा सूर शिक्षकांमध्ये ऐकायला मिळत आहे. कोणतीही योजना कागदावर आली म्हणजे ती राबविली असा अर्थ होत नाही. शाळा व्यवस्थापन समितीची आर्थिक सुबता नाही. ही योजना राबविण्यासाठी निधी कोठून आणायचा, याचा सभापतींनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रात कुठेही उल्लेख नाही. मग हा उपक्रम योजना राबविण्यासाठी लागणारा निधी, शिक्षकांचा समन्वय, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचा समन्वय या बाबींचा थातुरमातूर विचार करुन केवळ हा उपक्रम लादण्याचा प्रकार असल्याचा सूर शिक्षकवर्गात उमटत आहे. एकूणच या उपक्रमाबाबत साशंकतेचे वातावरण शाळांमध्ये निर्माण झाल्याने तो कितपत यशस्वी होतो, याबाबत संभ्रम आहे. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, शाळांमध्ये पोषण आहाराची रक्कम येते. त्यातून खाद्यपदार्थाचा खर्च करायचा आहे. तसेच समाज सहभागही घ्यायचा आहे. या उपक्रमाला शिक्षण समितीची मंजुरी मिळाली आहे. शाळेतील उपक्रमांना एकत्र करुन एक स्नेहमिलन सोहळा साजरा करायचा आहे. त्याला ‘दिवाळी सर्वांची स्नेहमिलन’ असे नाव दिले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)