शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवमंदिरात दर्शनाला गेले, येतांना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर; एकाचा पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:48 IST

Wardha : हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव दातार येथील सहा युवक रविवारी महाशिवरात्रीनिमित्त गावातील जुन्या वस्तीतील शिवमंदिरात दर्शनाला गेले होते. तेथून परतल्यावर त्यांना पोहण्याचा मोह झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट (वर्धा) : हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव दातार येथील सहा युवक रविवारी महाशिवरात्रीनिमित्त गावातील जुन्या वस्तीतील शिवमंदिरात दर्शनाला गेले होते. तेथून परतल्यावर त्यांना पोहण्याचा मोह झाला. मात्र, त्यापैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी २:३० वाजताच्या सुमारास वणा नदीवरील आजंती धरण येथे घडली.

आकाश शेषराव बावणे (वय २१) असे मृत युवकाचे नाव आहे. सहा युवक रविवारी सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास गावातील जुन्या वस्तीमध्ये असलेल्या शिवमंदिरात शिवदर्शन घेण्याकरिता गेले होते. दर्शन झाल्यानंतर ते नवीन वस्तीत आपापल्या घरी परतले. काही वेळाने दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास आकाश आपला मित्र अथर्व गौरकर व आणखी चार युवकांसोबत आजंती डॅम येथे पोहायला गेले. नदीपात्रातून बाहेर निघताना आकाश बावणे चप्पल पायातून निसटल्याने तो पुन्हा पाण्यात उतरला. पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. मित्रांच्या डोळ्यांदेखत तो पाण्यात गायब झाला.

घटनेची माहिती गावात पोहोचताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. भीमराव ठाकरे यांनी हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली. सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास अखेर आकाशचा मृतदेह हाती लागला. गावातील संतोष मन्ने यांनी आकाशचा मृतदेह खोल पाण्यातून शोधून बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.

आज होणार अंत्यसंस्कार

  • सोमवारी बोरगाव दातार येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
  • ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
  • मृत आकाशच्या मागे वडील, आई, लहान बहीण असा आप्त परिवार आहे.
  • या घटनेत इतर पाच मित्र बचावले. मात्र, त्यांच्या डोळ्यांदेखत आकाशचा जीव गेल्याने त्यांना धक्का बसला आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy strikes: Temple visit turns fatal; youth drowns in river.

Web Summary : A youth drowned in the Vana River near Ajanti Dam after visiting a temple. Akash Bawane, 21, went swimming with friends when he went back into the water to retrieve a slipper and drowned. His body was recovered later.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी