शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे गुरांसह आठवडी बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असताना ग्रामीण भागातदेखील सर्वसामान्य शेतकऱ्यांसह मजूरवर्गाने कोरोनाची धास्ती घेतली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये व आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम समुद्रपूर येथील सर्वांत मोठा गुरांचा बाजार व आठवडी बाजारावर झाला आहे.

ठळक मुद्देदीड कोटीची उलाढाल ठप्प : आर्थिक मंदीचे सावट

सुधीर खडसे।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत असताना ग्रामीण भागातदेखील सर्वसामान्य शेतकऱ्यांसह मजूरवर्गाने कोरोनाची धास्ती घेतली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये व आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम समुद्रपूर येथील सर्वांत मोठा गुरांचा बाजार व आठवडी बाजारावर झाला आहे. या बाजाराची महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात नोंद आहे. तसेच तालुक्यातील कोरा, नंदोरी, गिरड, मांडगाव, जाम या बाजारावरही कोरोनाचा परिणाम झाला आहे.समुद्रपूर गुरांच्या बाजारात जिल्ह्यातील नव्हे इतर जिल्ह्यातील गुरांचे व्यापारी गाई, म्हैशी, बैलजोडी खरेदी करण्याकरिता या बाजारात मोठ्या संख्येने येतात. एका बैलजोडीची किंमत दीड ते दोन लाखांपर्यंत आहे. मात्र, राज्यासह देशावर कोरोनाचे सावट असल्याने खरेदीकडे अनेकांनी पाठ फिरविली आहे.परिणामी, येथील व्यवहार अडचणीत आले आहेत. तसेच येथील आठवडी बाजारात धान्य आणि मिरची बाजार याचाही समावेश आहे. तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामस्थांची ये-जा थांबल्याने व्यवहार ठप्प आहेत. एकंदरीत एक ते दीड कोटींची उलाढाल ठप्प झाल्याने आर्थिक मंदी येण्याची शक्यता शेतकरी, नागरिकांनी व्यक्त केली आहे.समुद्रपूर येथे गुरांचा बाजार रविवारी बंद ठेवल्याने गाई, म्हैशी, बैलजोडी, गुरे यांची विक्री व खरेदी न झाल्याने किमान दीड कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याने उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे.- शंकर धोटे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, समुद्रपूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या