शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

आम्हाला हवी जुनी पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 11:08 PM

राज्य शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांसह राज्य कर्मचाºयांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना बंद करुन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. नवी पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित असून या पेन्शन योजनेमुळे कुटुंब निवृत्तीवेतन मिळत नाही.

ठळक मुद्देशिक्षकांसह कर्मचाऱ्यांचा एल्गार : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव व खाजगीकरण,कंत्राटीकरण धोरण रद्द करुन राज्यातील सर्व कार्यालयात असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासह असंख्य मागण्यांसाठी राज्यातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय बंदची हाक दिली होती. त्या अनुषंगाने आज सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्यांचे मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.१ नोव्हेंबर २००५ पासून राज्य शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांसह राज्य कर्मचाºयांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना बंद करुन परिभाषित अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. नवी पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित असून या पेन्शन योजनेमुळे कुटुंब निवृत्तीवेतन मिळत नाही. सेवानिवृत्तीपश्चात तसेच सेवेत असताना कर्मचारी-शिक्षकाचा मृत्यू झाल्यास नवीन योजनेमुळे कोणतेही लाभ मिळत नाही. संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते. या पार्श्वभूमीवर सर्वांना समन्यायी अशी १९८२ ची जुनी पेन्शन योजना, कुटुंब निवृत्तीवेतन योजना आणि १९८४ ची भविष्य निर्वाह निधी योजना लागू करावी अशी मागणी आहे. पण, या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.अनेकदा या संबंधाने मोर्चे, आंदोलने होऊनही शासन याबाबत निर्णय घेत नसल्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने ५ सप्टेंबर पासून काळी फीत लावून काम करण्याचे जिल्हाभरात आंदोलन केले. त्यानंतर सोमवारी एकदिवसीय संप तसेच मोर्चाचे आयोजन केले होते. स्थानिक महात्मा गांधी शाळेच्या प्रांगणातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावर पोलिसांनी हा मोर्चा अडविल्यानंतर तेथेच हेमंत पारधी, विजय कोंबे, प्रफुल्ल कांबळे, पांडुरंग भालशंकर, लोमेश वºहाडे, रवींद्र राठोड, सुरेश राऊत आदींनी मार्गदर्शन केले.त्यादरम्यान जुनी पेन्शन हक्क संघटनेचे पदाधिकारी सुशील गायकवाड, प्रफुल्ल कांबळे, आशिष बोटरे, कृष्णा तिमासे, सुरेश बरे व माया चाफले यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांना दिले.या मोर्चात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुरोगामी शिक्षक संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ, केंद्र प्रमुख संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती यांच्यासह विविध कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या.झेडपीचे तीन हजारांवर कर्मचाऱ्यांचा संपात सहभागच्जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्यां सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग, कार्यकारी अभियंता (लघुसिंचन, बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा),पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पशुधन विकास अधिकारी, कृषी विभाग, वित्त विभाग, उपमु्ख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण), शिक्षणाधिकारी (माध्यमिक व प्राथमिक), जिल्हा आरोग्य अधिकारी, समाजकल्याण विभाग तसेच आठही तालुक्यातील गटविकास अधिकारी कार्यालयात एकूण ३ हजार ६८५ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी तब्बल ३ हजार ६० कर्मचारी संपात सहभागी झाल्याने केवळ ५१५ कर्मचारीच कार्यालयात उपस्थित होते. उर्वरीत १०८ कर्मचारी रजेवर तर २ कर्मचारी दौºयावर होते. त्यामुळे या सर्व विभागात शुकशुकाट असल्याने कामकाज खोळंबले होते.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन