शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तपासणी पथकांचा वाहनांवर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक शाखेने पथक नियुक्त केली आहे. भरारी पथक १६, स्थीर सर्व्हेंक्षण पथक १६, व्हिडीओ चित्रीकरण पथक १६, व्हीडीओ चित्रिकरण पाहणी पथक ५ व खर्चनियंत्रण पथक ५ अशी एकूण ५८ पथक नियुक्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : ५८ पथकाची निर्मिती, चेक नाक्यावर होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासूनच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक विभागाने विविध ५८ पथक स्थापन केले आहे. ही सर्व पथके आचारसंहिता लागू झाल्यापासूनच सक्रीय झाले आहे. जिल्ह्यातील मद्य व रोख रक्कम वाहतूकीवर या पथकांची करडी नजर असणार आहे.आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा निवडणूक शाखेने पथक नियुक्त केली आहे. भरारी पथक १६, स्थीर सर्व्हेंक्षण पथक १६, व्हिडीओ चित्रीकरण पथक १६, व्हीडीओ चित्रिकरण पाहणी पथक ५ व खर्चनियंत्रण पथक ५ अशी एकूण ५८ पथक नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय पोलीस विभागाने १६ पथक तयार केले आहेत. हे पथक नियमित तपासणी करीत आहेत. या पथकांच्या माध्यमातून वाहन तपासणी, आचारसंहिता भंगाची तक्रार असल्यास कार्यवाही करणे, मद्य वाहतूक व रोख रक्कम वाहतुकीवर नजर ठेवण्याचे काम सर्वत्र सुरु आहे. नागरिकांनी रोख रक्कम बाळगतांना त्यांचे पुरावे सोबत बाळगणे आवश्यक आहे. आचारसंहितेच्या काळात रोख रक्कम वाहतुकीवर आयोगाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास रोख रक्कम प्रवासात बाळगू नये. मतदार यादीत नाव शोधणे, इपिककार्ड आदीसाठी निवडणूक आयोगाने १५० हा टोल फ्री क्रमांक सर्वांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. नागरिकांनी मतदार यादी व नाव यासंबधी तक्रारी समस्या या क्रमांकावर नोंदवाव्या. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नागरिकांनी नोंदविता याव्यात यासाठी आयोगाने सीव्हीजील अ‍ॅप सुरु केले असून या अ‍ॅपव्दारे प्राप्त तक्रारीचे १०० तासात निराकरण करण्यात येणार आहे.पन्नास हजारावर रक्कम बाळगण्यास मनाईआचारसंहितेच्या काळात प्रवास करीत असतांना नागरिकांनी ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगू नये असे निर्देश लोकसभा निवडणूकीत आयोगाने दिले होते. हा नियम याही वेळी असणार आहे. ५० हजारांपेक्षा जास्त रक्कमेचे पुरावे सादर करावे लागतील अन्यथा रक्कम जप्त होणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019