शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा झेडपीच्या आरक्षणामुळे इच्छुकांना धक्का ! निवडणूक होणार की नाही? २१ जानेवारीच्या सुनावणीकडे लागल्या नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:29 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लांबणार : तयारीला मिळाली होती गती, पुन्हा आस्ते कदम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ५ फेब्रुवारीपर्यंत घेणार असल्याची घोषणा केली. मात्र, ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण निघालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना त्यातून वगळले आहे. यात वर्धा जिल्ह्याचाही समावेश असल्याने या वाढलेल्या आरक्षणामुळे निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना पुन्हा धक्का बसला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल तीन ते साडेतीन वर्षानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याच्या प्रशासकीय हालचालींना वेग आला होता. निवडणूक आयोगाकडून प्रशासकीय तयारीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार गट, गणाची रचना, आरक्षण व मतदार यादी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे आता निवडणुकीचा बिगुल वाजणार, अशी अपेक्षा इच्छुकांना होती. त्यामुळे त्यांनी सर्कलमध्ये भेटीगाठी, कार्यकर्त्यांचे मेळावे यासह इतरही कार्यक्रमांना सुरुवात केली होती. पण, अशातच निवडणूक आयोगाने नगरपालिकाचा कार्यक्रम जाहीर करून निवडणुका घेतल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका मागे पडल्या. आता तरी निवडणुका होईल, अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, वाढलेल्या आरक्षणामुळे पुन्हा दुसऱ्यांदा इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. 

२१ जानेवारीच्या सुनावणीकडे लागल्या नजरा

५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण दिलेल्या जि.प. आणि पं. स. बाबत २१ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात महत्त्याची सुनावणी होणार आहे. नगरपरिषदप्रमाणे अतिरिक्त आरक्षण देणाऱ्या जि.प.चीही निवडणूक होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, न्यायालयाने अधिक आरक्षणाच्या संस्था वगळून निवडणूक देण्याचे दिले.

तीन पंचायत समितीच्या आरक्षणाने ओलांडला टक्का

पंचायत समिती    एकूण जागा    एससी      एसटी          नामाप्र           टक्केवारीआर्वी                         १२                 ०२              ०२                 ०३               ५८.३३वर्धा                           २८                ०५              ०३                 ०७              ५३.५७देवळी                        १२                ०२               ०२                 ०३               ५८.३३समुद्रपूर                     १२                ०१                ०२                ०३                  ५०हिंगणघाट                   १४                ०२               ०२                 ०३                 ५०  आष्टी                          ०६               ०१               ०१                  ०१                 ५०सेलू                            १२                ०१              ०२                  ०३                 ५०कारंजा                        ०८                ०१              ०१                  ०२                 ५०

जिल्हा परिषदेचे आरक्षण काय सांगतात ?

एकूण सदस्य संख्या - ५२अनुसूचित जाती - ०७अनुसूचित जमाती - ०७नागरिकांचा मागास प्रवर्ग - १४सर्वसाधारण - २४आरक्षणाचा टक्का - ५३.८५

जिल्ह्यात किती गट-गणात होणार सार्वत्रिक निवडणूक

जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे एकूण ५२ गट आहेत तर पंचायत समितीचे १०४ गण आहेत. या सर्वांकरिता सार्वत्रिक निवडणुकीची प्रतीक्षा आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समितींमध्ये प्रशासकराज आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला खीळ बसली असून तातडीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची गरज आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे आरक्षण ५३.८२ टक्क्यांवर पोहोचल्याने निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wardha ZP Reservation Shocks Aspirants! Election Uncertain, Eyes on January 21 Hearing

Web Summary : Wardha Zilla Parishad election prospects dim due to over 50% reservation. Aspirants disappointed as court hearing on January 21st becomes crucial for poll clarity.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग