शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

Wardha Blast : पोटाची आग शमविण्यासाठी डोक्यावर जिवंत बॉम्ब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:53 PM

पैशासाठी हपापलेला कंत्राटदार आणि त्याच्याकडून लाखोंची मलाई मिळत असल्याने लष्कराचे संबंधित अधिकारी सुरक्षेचे कोणतेही कवच न देता मजुरांना रोज मृत्यूच्या दाढेत पाठवत असल्याची संतापजनक माहिती आहे. जीवन-मरणाच्या लढाईत अडकलेले गरीब मजूर पोटाची आग शमविण्यासाठी आणि २०० ते ३०० रुपये पदरात पाडून घेण्यासाठी चक्क जीवघेणे बॉम्ब डोक्यावर वाहून नेत होते.

ठळक मुद्देकंत्राटदार मिळवतो रोज ५ लाख, मजुरांच्या हातात २०० रुपये

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पैशासाठी हपापलेला कंत्राटदार आणि त्याच्याकडून लाखोंची मलाई मिळत असल्याने लष्कराचे संबंधित अधिकारी सुरक्षेचे कोणतेही कवच न देता मजुरांना रोज मृत्यूच्या दाढेत पाठवत असल्याची संतापजनक माहिती आहे. जीवन-मरणाच्या लढाईत अडकलेले गरीब मजूर पोटाची आग शमविण्यासाठी आणि २०० ते ३०० रुपये पदरात पाडून घेण्यासाठी चक्क जीवघेणे बॉम्ब डोक्यावर वाहून नेत होते.वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात रोजगाराची वाणवा आहे. त्यामुळे येथील तरुण मिळेल ते काम करतात. तालुक्यातील पुलगावचे केंद्रीय दारुगोळा भंडार केवळ भारतात नव्हे तर आशिया खंडात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देशाच्या सैन्यदलासाठी वापरण्यात येणारा दारुगोळा संग्रहित केला जातो. कालबाह्य दारुगोळा नष्ट करण्याचेही काम या परिसरात होते. पूर्वी लष्कराचे अधिकारी प्रशिक्षित अधिकारी आणि तंत्रज्ञांच्या देखरेखीत दारुगोळा नष्ट करण्याचे काम करायचे. खासगीकरण आणि त्याला चिकटलेली भ्रष्टाचाराची कीड या महत्त्वपूर्ण आणि धोकादायक कामापर्यंतही पोहचली. पुलगावच्या चांडक बंधूने राजकीय वजन वापरून त्यांनी हे कंत्राट मिळवले अन् गेल्या काही वर्षांपासून त्यांनी दारुगोळा नष्ट करण्याचे काम सुरू केले. बॉम्ब नष्ट करण्यासाठी स्फोट घडविल्यानंतर सुमारे दोन क्विंटल लोखंड (तुकडे) आणि इतर धातूचे तुकडे असे सुमारे ५ ते ६ लाखांचे साहित्य त्यातून बाहेर पडतात. यातील १५ ते २० टक्के धातू मजुरांकडून उचलून नेली जाते. त्या बदल्यात प्रत्येक मजुराला २०० ते ३०० रुपये मिळतात. तर, उर्वरित धातू कंत्राटदार चांडक बंधूच्या घशात जाते. त्यातून त्याला ४ ते ५ लाख रुपये मिळतात. कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही, अशी माहिती आतमध्ये काम करणाऱ्यांपैकी काहींनी घटनास्थळी लोकमतला सांगितली. दरम्यान, ही घटना घडल्यापासून चांडक बंधू ‘आऊट आॅफ कव्हरेज एरिया’ आहे.भावनाशून्य व्यवहार !या भीषण घटनेत जीव गमविलेल्या आणि गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देणाऱ्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश सुरू आहे. दुसरीकडे चांडक बंधूने स्वत:ची कातडी वाचविण्यासाठी धावपळ चालविली आहे. या गुन्ह्यासाठी आपल्याला जबाबदार धरू नये तसेच याला अपघाताचे रूप देऊन आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल होऊ नये म्हणून, राजकीय नेत्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरुआहेत.

टॅग्स :Wardha Blastवर्धा स्फोटBombsस्फोटके