शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

क्षतिग्रस्त पुलाला दुरूस्तीची प्रतीक्षा

By admin | Updated: August 17, 2015 02:20 IST

चनाजी (टाकळी) ते सोनेगाव (बाई) या गावांना जोडण्यासाठी भदाडी नाल्यावर पूल बांधण्यात आला. मात्र हा पूल प्रत्येक पावसाळ्यात वाहुन जातो.

वर्धा : चनाजी (टाकळी) ते सोनेगाव (बाई) या गावांना जोडण्यासाठी भदाडी नाल्यावर पूल बांधण्यात आला. मात्र हा पूल प्रत्येक पावसाळ्यात वाहुन जातो. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गत चार वर्षांपासून हा प्रकार येथे घडत आहे. मात्र यावर कायमस्वरुपी तोडगा काढला नाही. या पुलाच्या बांधकामाची चौकशी करुन पूल उंच करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.परिसरातील ग्रामस्थांकरिता हा पूल महत्त्वाचा आहे. मात्र नाल्याल पूर आला की प्रवाहात पूल वाहुन जातो. त्यमुळे सोनेगाव (बाई) या गावाचआ संपर्क तुटतो. सोनेगाव (बाई) येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी वायगाव (नि.), सरूळ, वर्धा येतात. तसेच सोनेगाव (बाई) येथील ग्रामस्थांसाठी बाजारपेठ वायगाव असल्याने खरेदीकरिता येथेच यावे लागते. पावसाळा आला की नाल्याला पूर येतो. यात पूल वाहुन गेल्यावर यातायात ठप्प होते. बसफेरी बंद होतात. येथून दुचाकी वाहन घेऊन जाणे शक्य होत नाही. पावसाळा संपला की पुलाची डागडुजी केली जाते. मात्र पावसाळ्यात पुलाची अवस्था जैसे थे होते. याबाबत देवळी येथील बांधकाम विभागाला विचारणा असता योग्य माहिती देण्याचे टाळतात. डागडुजी करण्यासाठी निधी नसल्याचे सांगुन हा पूल आमच्या विभागात येत नाही अशी सबब पुढे करतात. पंतप्रधान ग्राम सडक योजना कार्यालयात तक्रार केली असता कंत्राटद येथे डागडुजी म्हणून दगड व मुरूम टाकतात, असे सांगण्यात येते. हा पूल नेमक्या कोणत्या विभागाच्या देखरेखीत येतो यावर संभ्रम कायम आहे. या प्रकारामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिवाय ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशात गावात कोणी आजारी पडल्यास त्याला वेळेवर उपचार मिळत नाही. पावसाळा आला की सोनेगाव (बाई) या गावाचा संपर्क तुटतो. हा प्रकार चार वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे येथे बस अथवा खाजगी वाहन येत नाही. प्रशासनाकडे विचारणा केली ते जबाबदारी झटकतात. येथील पुलाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)