शहरं
Join us  
Trending Stories
1
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
2
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
3
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
6
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
7
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
8
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
9
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
10
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
11
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
12
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
13
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
14
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
15
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
16
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
17
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
18
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
19
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
20
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
Daily Top 2Weekly Top 5

वायगाव (गोंड) पारधी बेड्याला वादळाचा तडाखा

By admin | Updated: May 6, 2016 01:55 IST

तालुक्यातील वायगाव (गोंड) येथील पारधी बेड्याला गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळामुळे १८ घरे उडाली तर सात बकऱ्या ठार झाल्या.

१८ घरांचे छत उडाले : सात बकऱ्या व असंख्य कोंबड्या मृत्यूमुखी
समुद्रपूर : तालुक्यातील वायगाव (गोंड) येथील पारधी बेड्याला गुरूवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळामुळे १८ घरे उडाली तर सात बकऱ्या ठार झाल्या. या वादळाच्या तडाख्यात ५० च्यावर कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. या वादळात घरावरील छप्पर उडाल्याने कुलर, टिव्ही, लाईनचे खांब व वृक्ष जमिनदोस्त झाले.
समुद्रपूर तालुक्यातील वायगाव (गोंड) या गावाच्या बाहेरच्या पारधी वस्ती आहे. गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान आलेल्या वादळी पावसामुळे संपूर्ण बेडाच उद्ध्वस्त झाला. यात मिलिंद मंगल पवार यांचे घर उडाले. त्यांच्या तीन बकऱ्या ठार झाल्या तर २० कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे जिनीता राऊत यांनी नुकतेच घराचे काम सुरू केले होते. लेंटर सज्जा पर्र्यंत भिंती उभ्या झाल्या होत्या; परंतु वादळामुळे त्या जमिनदोस्त झाल्या. यात त्यांच्या मालकीच्याही दाने बकऱ्या आणि १० कोंबड्या ठार झाल्या. अनंता भोसले यांचे घर पडले असून दोन बकऱ्या जखमी झाल्या तर १२ कोंबड्या ठार झाल्या. ललीता भोसले यांचे घर उडाले. या व्यतिरिक्त सर्कस पवार, राजकला पवार, सुभाष बकाल, अंकीत पवार, शक्तीकपूर राऊत, संजय पवार, जंगलू पवार, राजेश भोसले, इद्रपाल पवार, शंकुतला भोसलेख पितृल भोसले, निलेश भोसले, शिशुपाल पवार यांची घरे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कित्येकांचे कुलर, टिव्ही संचाचे नुकसान झाले. १० ते १२ वीज खांब वाकले, तीन झाडे उन्मळून पडली. तलाठ्याने पारधी बेडा गाठत पंचनामा केला. नुकसानीचा अहवाल तहसीलदार सचिन यादव यांच्याकडे सादर केल्याचे सांगितले. मात्र जोपर्यंत ६० मी.मी. पाऊस होणार नाही तोपर्यंत वादळग्रस्तांना मदत मिळत नाही, या अटीमुळे त्यांना प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)