शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

ग्रामस्थांनी रोखली यवतमाळ-उमरेड बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:18 IST

वर्धा-नागपूर महामार्गावरून धावणाऱ्या महामंडळाच्या बसेसला केळझर येथे थांबा देण्यात आला आहे. त्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी रापमच्या विभाग नियंत्रकांकडे पाठपुरावा केला होता.

ठळक मुद्देथांबा असतानाही वाहन थांबविले नाही : प्रवाशांचा संताप

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : वर्धा-नागपूर महामार्गावरून धावणाऱ्या महामंडळाच्या बसेसला केळझर येथे थांबा देण्यात आला आहे. त्यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी रापमच्या विभाग नियंत्रकांकडे पाठपुरावा केला होता. असे असतानाही रापमच्या चालक व वाहकाने केळझर येथे बस थांबविण्यास नकार दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी यवतमाळ-उमरेड बस रोखून सदर घटनेचा निषेध नोंदविला.रापमचे हेकेखोर चालक व वाहक येथे बस थांबत नसल्याची खोटी बतावणीच प्रवाशांना करतात. शिवाय एखाद्या प्रवाशाने बसचा थांबा असल्याचे सांगिल्यावर त्याला उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. असाच काहीसा प्रकार येथे झाल्यावर संतप्त ग्रामस्थांनी वाहन थांबवून वाहक व चालकाला घेराव घातला. रविवारी सायंकाळच्या सुमारास केळझर येथील काही रहिवासी वर्धा येथून केळझरला जाण्याकरिता यवतमाळ आगाराच्या यवतमाळ-उमरेड बसमध्ये चढले. त्यांनी महिला बस वाहकाला केळझरची तिकीट मागितली. यावेळी सदर महिला वाहकाने त्यांना केळझरची तिकीट मशीनमधून येत नसल्याचे सांगितले. शिवाय केळझर येथे बस थांबणार नाही तुम्ही सेलूपर्यंतचे तिकीट घेण्याचा सल्ला दिला. याच बसमध्ये गावातील सामाजिक कार्यकर्ते युसुफ शेख हे सुद्धा होते. त्यांनी सदर वाहकाला केळझरला बसचा थांबा असल्याचे सांगितले. परंतु, सदर महिला वाहक समजण्यास तयार नव्हती. उलट वाद घालण्याचा प्रयत्न यावेळी झाला. अखेर सेलूच्या बोरधरण चौकात बस थांबली असता केळझरच्या प्रवाशांना बसखाली उतरण्याचे बसच्या चालक व वाहकांनी सांगितले. त्यानंतर सदर प्रवाशांनी आम्ही केळझरला उतरू असे सांगत आपल्याला वाटत असेल तर वाहन थेट पोलीस ठाण्यात न्या; आम्ही येतो, असे सांगितले. यावेळी सुमारे १५ मिनिटे बस सेलूच्या बोरधरण चौकात उभी राहिली. शेवटी बसच्या चालक व वाहकांनी पुढील प्रवासाला सुरूवात केली. याच दरम्यान सदर घटनेची माहिती उपसरपंच फारूख शेख यांना मिळाली. सेलू ते केळझर या प्रवासादरम्यान वाहकानेच केळझरची तिकिट काढून दिली. बस केळझर येथे पोहोचताच तिला संतप्त ग्रामस्थांनी अडविली. तसेच वाहक व चालकाविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी रेटून धरली होती.

टॅग्स :Bus Driverबसचालकstate transportराज्य परीवहन महामंडळ