शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसांपासून तणावात होते गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST

आरोपी व पीडिता यांच्या दोघांच्याही घराजवळ पोलिसांचा मोठा लवाजमा राहात होता. दररोज रात्री गावात तरूण व नागरिक रस्त्यावर उतरून मोर्चा काढून या घटनेचा निषेध करीत होते. मात्र या गावाने आपला संयम ढळू दिला नाही. अखेर सोमवारी १० तारेखाला दुखाची बातमी आली.

ठळक मुद्देआरोपीच्या घराला चौफेर सुरक्षा : पीडितेचे कुटुंबीय गावात परतले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंगणघाट येथे गेल्या सोमवारी पीडित युवतीला पेट्रोल टाकून जाळून टाकण्यात आले. या घटनेपासून हिंगणघाट तालुक्यातील पीडिता व आरोपी यांचे गाव तणावाखाली जगत होते. गावच्या लेकीवर हा कसा प्रसंग कोसळला याची चिंता गावातील वयोवृध्दांसह बाया, माणसं सर्वांनाच होती. घटनेनंतर गावात पोलिसांचा वावर वाढला होता.आरोपी व पीडिता यांच्या दोघांच्याही घराजवळ पोलिसांचा मोठा लवाजमा राहात होता. दररोज रात्री गावात तरूण व नागरिक रस्त्यावर उतरून मोर्चा काढून या घटनेचा निषेध करीत होते. मात्र या गावाने आपला संयम ढळू दिला नाही. अखेर सोमवारी १० तारेखाला दुखाची बातमी आली. गावाची लेक आपल्याला सोडून गेली, हे कळल्यावर गावकऱ्यांचा संयम सुटला. शेकडोच्या संख्येने लोकं त्या गावाकडे जावू लागले. त्यामुळे या गावाकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरून गेले होते.गावात शव येणार याची कल्पना देण्यासाठी सकाळी ७ वाजताच पोलिसांच्या गाड्या धडकल्या. पोलिसांनी गावातील प्रमुख लोकांना विश्वास घेत गावातील शांतता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेरीस दुपारी १ वाजून ५ मिनीटांनी पीडित मुलीचे शव रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी या रुग्णवाहिकेवरच दगडफेक सुरू केली. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यातून आणून दुपारनंतर अंत्यसंस्कार होईपर्यंत गावाचा संयम कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. पीडितेचा भाऊ बाहेरगावी असल्याने तो येईपर्यंत मृतदेह ठेवावा लागला. त्याला घेण्यासाठी वर्धा रेल्वे स्थानकावर अधिकाऱ्यांचा ताफा उपस्थित होता. त्याला घरी पोहचवताच पार्थिव मोक्षधामाच्या मार्गाने मार्गस्थ झाले. येथे प्रशासनाकडून लेखी हमी लिहून घेण्यात आली. त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडले. आठ दिवसापासून तणावात असलेल्या या गावात मुलीच्या मृत्यूने अनेकजण हळहळून गेले होते. गावातील उच्च शिक्षीत मुलगी गेली, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

टॅग्स :Policeपोलिस