शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
4
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
5
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
6
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
7
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
8
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
9
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
10
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
11
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
12
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
13
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
14
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
15
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
16
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
17
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
18
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
19
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
20
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
Daily Top 2Weekly Top 5

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान

By admin | Updated: December 21, 2015 02:19 IST

जनमानसात स्वच्छतेचा संदेश रुजविणारे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त देवळीच्या एस.एस.एन.जे महाविद्यालयातील ...

स्वच्छतेवर जनजागृती : गाडगेबाबांचा वसा पुढे नेण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प
वर्धा : जनमानसात स्वच्छतेचा संदेश रुजविणारे वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त देवळीच्या एस.एस.एन.जे महाविद्यालयातील नेताजी सुभाषचंद्र बोस रोव्हर स्काऊट पथक, राणी लक्ष्मीबाई रेंजर युनिट व राष्ट्रीय छात्र सेना पथकातर्फे पडेगाव येथे ‘ग्राम स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. एन.सी.सी.कॅडेटस, रोव्हर्स व रेंजर्सच्या नेतृत्वात गावातील मुख्य रस्ते स्वच्छ करून स्वच्छ ठेवा, स्वच्छ ठेवा आपले गाव स्वच्छ ठेवा ’ या जयघोषात प्रभातफेरी काढण्यात आली.
स्थानिक उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच त्रिशुला फुलझले, उपसरपंच नरेंद पहाडे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक संजय माटे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, स्काऊटचे सहसचिव राम बाचले, मुख्यालय आयुक्त रामदास वडयाळकर, जिल्हा स्काऊट संघटक प्रकाश डाखोळे, जिल्हा गाईड संघटक मंजुषा जाधव, युवा केंद्र समन्वयक आकांशा उगेमुगे, प्रा. रवींद्र गुजरकर, संतोष तुरक व एन.सी.सी. आफिसर प्रा. मोहन गुजरकर उपस्थित होते. संजय माटे मार्गदर्शनात म्हणाले, युवक एक अमोघ शक्ती आहे. त्या शक्तीचा योग्य उपयोग झाल्यास कोणतेही अशक्य काम शक्य होवू शकते. गावाच्या विकासाकरिता युवावर्गास मार्गदर्शन करुन योग्य काम करण्याची दिशा रोव्हर-रेंजर पथक व एन.सी.सी.छात्र सैनिक करीत असल्याचे ते म्हणाले. वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांचा वसा सर्वांनीच पुढे नेण्याची गरज यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
समारोपीय कार्यक्रमात स्वयंसेवकांनी गाडगेबाबांच्या जीवनातील प्रसंग ‘मुलगी झाली हो!’ या पथनाट्यातून सादर केला. यात संत गाडगेबाबांची भूमिका आशिष परचाके, आईची भूमिका करिश्मा वाघमारे हिने तर इतर कलाकार म्हणून सपना बनसोड, दीक्षा खैरकार, स्मिता सुरजुसे, राहुल वैद्य यांना भूमिका पार पाडल्या.
प्रास्ताविक प्रा. मोहन गुजरकर यांनी केले. संचालन सहाय्यक रेंजर लिडर आश्विनी घोडखांदे हिने तर आभार सपना बनसोड हिने मानले. यशस्वीतेकरिता रवी बकाले, सुमित तेलरांधे, धीरज कामडी, रोहित नरांजे, उमा मसराम व रोव्हर्सनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)

सम्यक बुद्धविहारात गाडगेबाबा स्मृती दिन

वर्धा - सम्यक बुद्ध विहार सांस्कृतिक भवन, प्रबुद्ध नगर मसाळा येथे संत गाडगे बाबा यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रकाश कांबळे, हरिका ढाले, छाया कांबळे, उपस्थित होते. दगडात देव नसून माणसात देव आहे असे विचार जनमानसात रुजविणारे एकही संत गाडगेबाबा एकही वर्ग शिकलेले नव्हते. त्यामुळे आजच्या काळातील ते खरे वैज्ञानिक संत आहेत. त्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, अंधविश्वास, वाईट चाळी रिती विरोधात संघर्ष केला. ते चालते-बोलते विद्यापीठ होते असे विचार सुनील ढाले यांनी व्यक्त केले. इतरही मान्यवरांनी विचार व्यक्त केले. संचालन मृणाल कांबळे यांनी केले. तर आभार सुहानी ढाले यांनी मानले.