शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

सीसीआयच्या वजन काट्यात तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 6:00 AM

तालुक्यातील अडेगाव येथील शेतकरी राजू सेलसुरकर यांनी २८ क्विंटल ८० किलो वजानाची कापूस गाडी बाजारात विकायला आणली. या कापसाची खरेदी सीसीआयने केल्याने साबाजी जिनिंगमध्ये वजन केले असता २८ क्विंटल ६० किलोच भरली. शेतकऱ्याने हा कापूस घरुनच मोजून आणल्याने हा फरक शेतकऱ्याला कळला. त्यामुळे सेलसुरकर यांनी बाजार समितीकडे तक्रार केली.

ठळक मुद्देग्रेडर व मालकाचे संगनमत : साबाजी जिनिंगमधील खरेदी बंद

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : येथील साबाजी जिनिंगमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरु आहे. येथे शेतकऱ्याने घरुन मोजून आणलेला कापूस वीस किलोने कमी भरला. त्यामुळे शेतकऱ्यालाही आश्चर्याचा धक्काच बसल्याने त्याने बाजार समितीकडे तक्रार केली. जिनिंग मालक व ग्रेडरच्या संगनमताने अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असल्याचा आरोप होत असल्याने बाजार समितीने साबाजी जिनिंगमधील कापूस खरेदी आजपासून थांबविली आहे.तालुक्यातील अडेगाव येथील शेतकरी राजू सेलसुरकर यांनी २८ क्विंटल ८० किलो वजानाची कापूस गाडी बाजारात विकायला आणली. या कापसाची खरेदी सीसीआयने केल्याने साबाजी जिनिंगमध्ये वजन केले असता २८ क्विंटल ६० किलोच भरली. शेतकऱ्याने हा कापूस घरुनच मोजून आणल्याने हा फरक शेतकऱ्याला कळला. त्यामुळे सेलसुरकर यांनी बाजार समितीकडे तक्रार केली. तक्रारीनंतर बाजार समितीने साबाजी जिनिंगच्या वजन काट्याचा पंचनामा केला असता २ टन वजनामागे दहा किलोचा फरक आढळून आल्याचे सांगण्यात आले. तर जिनिंग मालकाने वजन काट्यात कोणताही फरक आढळून आला नाही, असे सांगितले. या सर्व प्रकारावरुन बाजार समिती आणि जिनिंग मालकांच्या तपासणीत एकवाक्यता येत नसल्याने वजन काट्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.आतापर्यंत या वजन काट्यावर अनेक शेतकऱ्यांना गंडविल्याचा आरोप होत असल्याने बाजार समितीने साबाजी जिनिंगमधली कापूस खरेदी बंद केली आहे. आता पुढे काय कारवाई होते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.सीसीआयकडून ३० हजार क्विंटल कापसाची खरेदीलांब धाग्याच्या कापसाची बाजारपेठ म्हणून देवळीचा विदर्भात नावलौकीक आहे. मागील वर्षी या केंद्रावर सहा लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. या हंगामात आजपर्यंत साठ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. खाजगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत सीसीआयचे दर बऱ्यापैकी असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा ओढा सीसीआयकडे आहे. याचाच फायदा सीसीआयकडून उचलत शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे.येथील ज्योतवाणी, साबाजी व श्रीकृष्ण या तीन जिनिंगसोबत सीसीआयचा कापूस खरेदीचा करार झाला आहे. परंतु, वजनकाट्याच्या कारणामुळे शुक्रवारपासून साबाजी जिनिंगमधील खरेदी बंद केल्याने उर्वरीत दोन जिनिंगमध्ये खरेदी सुरू आहे. शुक्रवारपर्यंत या तीन जिनिंगमध्ये ३० हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी केली आहे. या भागातील कापसात प्रती क्विंटल मागे ३६ किलोपर्यंत रूईचे प्रमाणे असल्याने आर्थिक फायद्यासाठी हा सर्व प्रकार होत असून तिन्ही केंद्रावर चौकशी करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड