शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना व्हॅक्सिन देण्याचा पाच केंद्रांवरून झाला श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 05:00 IST

४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून कोविडची लस दिली जात आहे; पण १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ही लस नि:शुल्क की नाममात्र शुल्क आकारून द्यायची, याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना केंद्र सरकारने दिले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येक लाभार्थ्याला राज्य सरकार नि:शुल्क लस देणार असून, केंद्राकडून खरेदी केलेल्या ३ लाख लसीच्या डोजपैकी ५ हजार डोज वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.

ठळक मुद्देप्रत्येक केंद्रावर पोहोचले लसीचे एक हजार डोस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम रविवारी जिल्ह्यातील पाच केंद्रांवरून सुरू झाली असून, या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनाच व्हॅक्सिन दिली जात आहे. या पाचही लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी एक हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत.४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून कोविडची लस दिली जात आहे; पण १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना ही लस नि:शुल्क की नाममात्र शुल्क आकारून द्यायची, याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारांना केंद्र सरकारने दिले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येक लाभार्थ्याला राज्य सरकार नि:शुल्क लस देणार असून, केंद्राकडून खरेदी केलेल्या ३ लाख लसीच्या डोजपैकी ५ हजार डोज वर्धा जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. हीच व्हॅक्सिन १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवत जिल्ह्यातील पाच केंद्रांवरून रविवारी प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. या पाचही केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अपॉइंटमेंट घेऊन आलेल्या लाभार्थ्याला कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. 

प्रत्येक दिवशी शंभर लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक लस देण्याचे उद्दिष्टरविवारपासून सुरू झालेल्या या लसीकरण केंद्रांवरून प्रत्येक दिवशी १८ ते ४४ वयोगटातील शंभर लाभार्थ्यांना कोविडची लस देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मुबलक लससाठा उपलब्ध होताच लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून नियोजित वेळेत लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनाच कोविडची लस दिली जात आहे.-डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस