शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सत्रात ७,३२७ बालकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

महामारीतही बालकांचे लसीकरण रखडले नसून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सात हजार ३२७ बालकांना लस देण्यात आली आहे. मात्र, कोरोनायनात बालकांना घराबाहेर कसे न्यावे, असा प्रश्न पालकांना पडला असून पालकांसमोर मोठा प्रश्न पडला आहे.

ठळक मुद्देबाळाला बाहेर न्यायचे कसे : पालकांना पडला मोठा प्रश्न

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बालकांना आजारापासून दुर ठेवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक लसी दिल्या जातात. भविष्यात गंभीर आजारांपासून या बालकांचे रक्षण होवून त्यांचे आयुष्य निरोगी राहावे, यासाठी आरोग्य विभाग सातत्याने लसीकरणाची मोहीम राबवित असतो. या मोहीमेचा लाभ जास्तीत जास्त बालकांना व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, कोरोना महामारीतही बालकांचे लसीकरण रखडले नसून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सात हजार ३२७ बालकांना लस देण्यात आली आहे. मात्र, कोरोनायनात बालकांना घराबाहेर कसे न्यावे, असा प्रश्न पालकांना पडला असून पालकांसमोर मोठा प्रश्न पडला आहे.मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. लसीकरणासाठी खात्रीशीर समजल्या जाणाऱ्या ग्रामीण आरोग्य केंद्रात लागणाºया रांगा कोरोना काळात गायब झाल्या. एकीकडे कोरोनावर एखादी लस आली तर किती बरे होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र, इतर आजारांपासून आपल्या बाळाला सुरक्षित ठेवणारी लस देण्यासाठी बाळाला बाहेर कसे न्यायचे, असा प्रश्न सध्या पालकांपुढे उभा ठाकला आहे.या लॉकडाऊन व कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येणारी लसीकरण मोहीम विस्कळीत झाली होती.एप्रिल आणि जून महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात कोरोना बाधित रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत चालल्याने लसीकरण मोहीमेवर काही प्रमाणात परिणाम झाला. मात्र, आरोग्य विभागाने घरोघरी जात बालकांचे लसीकरण केले असून पालकांना दिलासा मिळाला.वंचित बालकांचा शोधकोरोना संसर्गामुळे प्रतिबंधित क्षेत्रात लसीकरणाचे सत्रे आयोजित करण्यावर मर्यादा येत होत्या. तसेच महामारीच्या काळात बालकांना घेऊन लसीकरण कसे करावे, अशी भीती पालकांच्या मनात आहे. यामुळे अनेक बालके लसीकरणापासून वंचित राहिली आहे. यामुळे बालकांना विविध आजारांना पुढे सामोरे जावे लागू शकते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल